Header Ads

Header ADS

पाच दिवसांत चांदी २ हजार, सोने ९०० रुपयांनी घसरले

 

In five-days-silver-2-thousand-gold-dropped-by-900-rupees

पाच दिवसांत चांदी २ हजार, सोने ९०० रुपयांनी घसरले 

लेवाजगत न्यूज जळगाव-सुवर्ण नगरी जळगाव येथे  सोन्या-चांदीच्या दरात ऑक्टोबरच्या पहिल्या पाच दिवसातच मोठी घसरण नोंदवली गेली आहे. पितृपक्षात मौल्यवान धातुंच्या मागणीत घट होणे हे दर कमी होण्यामागील कारण असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात ५९ हजार ९०० पर्यंत पोहचून ५८ हजार २०० प्रति तोळ्यापर्यंत आलेले सोने पुन्हा ९०० रुपयांनी घसरून शुक्रवारी ५७ हजार ३०० झाले आहे.



In five-days-silver-2-thousand-gold-dropped-by-900-rupees


     सोने दरात सध्या जरी घसरण दिसत असली तरी नवरात्रोत्सवात दरात पुन्हा तेजी येवून सोने ६५ हजारांवर जातील असे सराफांचे म्हणणे आहे. चांदीच्या दरात गेल्या आठवड्यात २५०० रुपयांची घसरण झाल्याने ती ७० हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली होती. त्याचे दर आता पुन्हा ६८ हजार  रुपयांपर्यंत खाली आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.