Header Ads

Header ADS

हुतात्मा एक्स्प्रेसने ऐन दिवाळीत भुसावळकरांच्या तोंडाला पुसली पाने, लोकप्रतिनिधी गप्प का प्रवाशांना प्रश्न ?



हुतात्मा एक्स्प्रेसने ऐन दिवाळीत भुसावळकरांच्या तोंडाला पुसली पाने,

लोकप्रतिनिधी गप्प का प्रवाशांना प्रश्न ?

लेवाजगत न्यूज भुसावळ-रेल्वे प्रशासनाने ११०२५ व ११०२६ पुणे - भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेसचा आता अमरावतीपर्यंत विस्तार केला आहे. यामुळे प्रवाशांमध्ये संतप्त भावना आहे. कारण, आधीच भुसावळातून   पुण्यासाठी स्वतंत्र गाडीची मागणी आहे. ती मागणी पूर्ण करणे दूर उलट आहे ती गाडी अमरावतीपर्यंत करून भुसावळकरांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. ही गाडी भुसावळऐवजी अमरावतीहून सुटल्यास भुसावळातील प्रवाशांना जागा मिळणार नाही. एवढे होऊनही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मात्र मूग गिळून गप्प का असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. 

Hutatma-express-wiped-the-mouth-of-the-mouth-of-Bhusawalkar-in-diwali-why-the-public-representative-is-silent-to-passengers-question?



    ११०२५, ११०२६ पुणे - भुसावळ पुणे ही दररोज धावणारी हुतात्मा एक्सप्रेस आता भुसावळऐवजी अमरावती येथून सुटेल, भुसावळसह यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, चोपडा आदी भागांतून  चिंचवड व पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. यामुळे भुसावळ स्थानकातून पुण्यासाठी स्वतंत्र गाडी असावी, अशी मागणी होती. त्यानुसार काही वर्षांपूर्वी मनमाड येथून सुटणारी हुतात्मा एक्स्प्रेस भुसावळ स्थानकावरून सुरू करण्यात आली. या गाडीचा प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद आहे. पण, कोरोना काळानंतर इतर सर्व गाड्या सुरू झालेल्या असताना हुतात्मा एक्स्प्रेस वेगवेगळ्या कारणांमुळे नियमित धावली नाही. यामुळे प्रवाशांमधून नाराजीचे सूर उमटताच हुतात्मा एक्स्प्रेसच्या जागेवर भुसावळ ते इगतपुरीपर्यंत मेमू सुरू करण्यात आली. परिणामी भुसावळ- मनमाडे- नाशिक- पनवेल मार्गे चिंचवड पुणे असा प्रवास थांबल्याने प्रवाशांच्या गैरसोयीत भर पडली. आता रेल्वेने अजून एक तुघलकी निर्णय घेत ही गाडी भुसावळऐवजी अमरावतीपर्यंत वाढवून भुसावळकरांच्या जखमेवर जणू मिठ चोळले. कारण, गाडी अमरावतीहून सुटल्यास भुसावळऐवजी विदर्भातील प्रवाशांची जास्त सोय होईल. दरम्यान, एकीकडे भुसावळ विभागातील प्रवाशांची गैरसोय होणार असताना जबाबदार लोकप्रतिनिधी मात्र, या विषयावर चिडीचूप आहेत. प्रवासी संघटना देखील मूग गिळून गप्प असल्याने प्रशासनाचे फावते आहे.

   

अतिरिक्त भाड्याचा भुर्दंड

    भुसावळ येथून चिंचवड व पुणे येथे जाण्यासाठी स्वतंत्र रेल्वे गाडी नाही. त्यामुळे सणासुदीत रेल्वेचे तिकिट नो रुम झाल्याने भुसावळकरांना लक्झरीचे २५०० रुपये तिकिट काढून प्रवास करावा लागतो. अशा स्थितीत भुसावळ-पुणे कल्याण चिंचवड मार्गे जाणारी हुतात्मा एक्स्प्रेस प्रवाशांना मोठा आधार ठरत होती. आता ती गाडी अमरावतीपासून सुरु झाल्याने भुसावळकरांची गैरसोय होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.