युद्ध हमासने सुरू केले आता आम्ही हे संपवणार, इस्रायलच्या पंतप्रधानांचा हमासला इशारा
युद्ध हमासने सुरू केले आता आम्ही हे संपवणार, इस्रायलच्या पंतप्रधानांचा हमासला इशारा
लेवाजगत न्युज
इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यातील संघर्ष आणखी चिघळत चालला आहे. ह्या संघर्षामध्ये आत्तापर्यंत इस्रायलच्या 900 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला तर 500 हून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. आता इस्रायलच्या पंतप्रधानांचा हमासला कडक शब्दात इशारा दिला आहे.
काय म्हणाले इस्रायलचे पंतप्रधान ?
हे युद्ध आम्ही सुरू केले नाही पण आम्हीच हे युद्ध संपवू, हमासच्या या हल्ल्याला अशाप्रकारे प्रत्युत्तर देईल की संपूर्ण वातावरण बदलून जाईल,असं म्हणत इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी हमासला कडक शब्दात इशारा दिला आहे.
'आम्ही हमासचा नायनाट करू. युद्धानंतर हमासकडे कोणतीही लष्करी क्षमता आणि गाझावर राज्य करण्याची क्षमता राहणार नाही, याचीही खात्री करु. असं इस्रायली संरक्षण दलाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.
भारत कोणाच्या बाजूने ? अनेक देशांनी हमासच्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे. फ्रान्स, ब्रिटन, भारत, जर्मनी, इटलीसह जगातील अनेक देशांनी इस्रायलला पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलं आहे. तर अमेरिकेने इस्रायलला लष्करी मदत देण्याची घोषणा केली आहे.
7 ऑक्टोबरला गाझा पट्टीतून पॅलेस्टिनी दहशतवादी हमासने जमीन, हवाई आणि समुद्रातून 5000 रॉकेट इस्रायलवर डागले. त्यानंतर युद्धाला सुरुवात झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत