संतापजनक! घरकाम करणाऱ्या दिव्यांग तरुणीवर घर मालकाने केला अत्याचार; पीडिता सात महिन्यांची गर्भवती
संतापजनक! घरकाम करणाऱ्या दिव्यांग तरुणीवर घर मालकाने केला अत्याचार; पीडिता सात महिन्यांची गर्भवती
लेवाजगत न्युज लातूर :- जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, घरोघरी धुणे-भांड्याचे काम करून आपली उपजीविका भागविणाऱ्या एका दिव्यांग तरुणीवर घर मालकाने बळजबरीने बलात्कार (Rape) केला आहे. धक्कादायक म्हणजे पीडित अपंग तरुणी सात महिन्यांची गर्भवती आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपीविरूध्द किनगाव पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना लातूरच्या रेणापूर तालुक्यातील एका गावात घडली आहे. तसेच, गुन्हा दाखल झाल्यावर आरोपी फरार झाला आहे.
रेणापूर तालुक्यातील एका गावात राहणारी तीस वर्षीय दिव्यांग तरुणी घरी धुणे-भांडे करण्याचं काम करायची. याचवेळी आरोपी विनायक सूर्यवंशी याच्या घरी देखील ती धुणे-भांडे करण्यासाठी येत होती. नियमितपणे सूर्यवंशी याच्या घरी काम करून ती आपली उपजीविका भागविते. मात्र, विनायक सूर्यवंशीची पिडीत तरुणीवर वाईट नजर होती. त्यामुळे त्याने एका दिवशी घरी आलेल्या पीडितेला एकटे गाठून घरातच तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला.
पीडिता सात महिन्यांची गर्भवती
सूर्यवंशी याने केलेल्या अत्याचाराच्या घटनेने पिडीत मुलगी प्रचंड घाबरून गेली होती. तसेच घडलेला प्रकार कोणाला सांगितली तर जीवे मारण्याचीही धमकी सुद्धा यावेळी सूर्यवंशी याने दिली होती. तसेच कोणालाही काहीही सांगितल्यास कामावर ठेवणार नसल्याचा दमही भरला. त्यामुळे कामावरून काढून टाकण्याच्या भीतीने या तरुणीने घडलेल्या घटनेची कोठेही वाच्यता केली नाही. या घटनेला सात महिन्यांचा कालावधी निघून गेला. परंतु, सात महिन्यानंतर पीडितेचे गर्भवर्ती असल्याने पोट दिसू लागले. दरम्यान या सर्व प्रकाराने ती प्रचंड घाबरून गेली होती. त्यामुळे तिने थेट किनगाव पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. त्यामुळे तिच्या फिर्यादीवरून किनगाव पोलीस ठाण्यात आरोपी विनायक सूर्यवंशी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी फरार...
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अहमदपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर, किनगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे, सहायक पोलीस उपनिरीक्षक गजानन तोटेवाड यांनी भेट देऊन चौकशी केली. पुढील तपास विभागीय पोलीस उपअधीक्षक मनीष कल्याणकर हे करीत आहेत. आरोपी विनायक सूर्यवंशी हा फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत