Header Ads

Header ADS

घनकचरा अधिनियमाची सावद्यात अंमलबजावणी पालिकेचा जनजागृती वर भर कर्मचाऱ्यांना ठरवून दिले वेळापत्रक


 घनकचरा अधिनियमाची सावद्यात अंमलबजावणी पालिकेचा जनजागृती वर भर कर्मचाऱ्यांना ठरवून दिले वेळापत्रक

लेवाजगत न्यूज सावदा- शहरात घनकचरा अधिनियम २०१६ ची प्रभावी अंमलबजावणी करणे बाबत नगरविकास विभाग

गाच्या परिपत्रका नुसार  दिनांक २५ ऑक्टोंबर पासून  शहरात निर्माण होणारा घरगुती कचरा शंभर टक्के वर्गीकरण करणे त्याबाबत शहरात जनजागृती आणि प्रत्यक्ष शंभर टक्के वर्गीकरण कश्याप्रकारे करायचे याचे प्रात्यक्षिक उदाहरण सह देणे  सुरु केलेले आहे. 




   यामध्ये दिलेल्या भागातील घंटागाडी सोबत आठवड्यातून एक दिवस सकाळी फिरून नागरिकांना ओला व सुका कचरा वर्गीकृत कसा करायचा याची माहिती देऊन सदर नागरिकांना माहिती देत असतानाचे फोटो सावदा नगरपरिषद व्हास्ट्स अँप गृप टाकण्याचे आदेश सुद्धा दिली आहेत. यात शहरातील प्रत्येक घनकचरा गाडी सोबत  पालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांना समावेश करण्यात आलेला आहे. तसेच सदर कामाकडे दुर्लक्ष्य केल्याचे निदर्शनात आल्यास आपणावर महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नागरी अधिनियम, १९६५ अनुसार कलम ७९(२) अन्वये शिस्त भंगाची कार्यवाही करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत. सदर कायर्क्रम सोमवार ते शनिवार ,रविवार वगळता रोज राबविण्यात येणार असून यासाठी दररोज वेगवेगळ्या अधिकारी व कर्मचारी यांना समावेश करण्यात आलेला आहे.  यामध्ये -  घंटागाडी मुकादम  सोपान घावट विरू आदिवाल हे असतील तर सोमवार रोजी विशाल पाटील, (लेखापाल), विमलेश जैन (रोखपाल), धीरज बनसोडे (संगणक तंत्रज्ञ), चंद्रकांत धांडे (शिपाई) मंगळवार रोजी सचिन चोळके (कार्यालय अधीक्षक), सतीश पाटील (वरिष्ठ लिपिक), मनोज चौधरी (लिपिक),

संदीप वाणी (शिपाई) बुधवार रोजी भारती पाटील (अंतर्गत लेखापरीक्षक), अरुणा चौधरी (शहर समन्वयक), विनय खक्के (CLTC),हिरामण पाटील (शिपाई) गुरुवार  जितेश पाटील (पालिका. अभियंता यांत्रिकी), अविनाश पाटील (तारतंत्री), संदीप पाटील (NULM), महेश इंगळे (समुदाय संघटन) शुक्रवार चेतन पाटील (कर निरीक्षक), बबन तडवी (लिपीक), कार्तिक ढाके (लिपीक), राजेंद्र मोरे (शिपाई) शनिवार  अविनाश गवळे (स्थापत्य अभियंता), हमीद तडवी (लिपीक), विश्वास साळी (लिपीक), रामा बँडवाल (मुकादम), भागवत घोगले (प्र. मुकादम) या प्रमाणे समावेश करण्यात आलेला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.