Header Ads

Header ADS

चिनावल ग्रामपंचायत निवडणूकीत मोठी चुरस सरपंच पदा साठी ५ तर ९ जागा साठी २४ उमेदवार रिंगणात ८ जागा बिनविरोध होवूनही निवडणूक रंगणार


Chinaval-Grampanchayat-Elections-Major-Challenge--5-for-Sarpanch-post-and-9-seats-for-24-candidates-in-the-ringan-8-seats-unopposed--elections-will be held


 चिनावल ग्रामपंचायत निवडणूकीत मोठी चुरस 

सरपंच पदा साठी ५ तर ९ जागा साठी २४ उमेदवार रिंगणात 

 ८ जागा बिनविरोध होवूनही निवडणूक रंगणार 

लेवाजगत न्यूज सावदा -रावेर तालुक्यातील चिनावल या सर्वात मोठ्या ग्रामपंचायत ची येत्या ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत मोठी चुरस होणार आहे. आधीच ८ जागा बिनविरोध होवूनही एस सी आरक्षित असलेल्या लोकनियुक्त सरपंच पदा साठी रिंगणात ५ उमेदवार आहेत तर प्रभागात निवडून द्यावयाच्या ९ जागांवर तब्बल २४ उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकल्याने ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे.






      चिनावल हे गाव राजकीय दृष्ट्या तालुक्यात महत्वाचे मानले जाते तब्बल ८५८५ एवढी मतदार संख्या असल्याने गावातील स्थानिक निवडणूकांवर सर्वच राजकीय नेत्याची नजर असते यंदा ही ग्रामपंचायत निवडणूक ही जरी स्थायिक पँनल रुपाने लढली जात असली तरी निवडणूकीत उतरलेल्या पँनल ला राजकीय पक्षाची किनार आहेच यात काही मातब्बर उमेदवार अपक्ष लढत असले तरी तयार झालेल्या पँनल मध्ये पारंपरिक एकमेकांच्या विरोधात लढणारे नम्रता पँनल हे भाजप पुरस्कृत तर यंदा तयार झालेले ग्रामविकास पँनल हे काँग्रेस प्रणित मानले जाते या वेळी या पँनल सोबतच अपक्षांनी दंड थोपटल्याने मोठी चुरस बघावयास मिळणार आहे.  

    चिनावल ग्रामपंचायत निवडणूकीत सरंपच पदा च्या  १ जागे साठी ५ जण रिगणांत आहे यात भाजप पुरस्कृत नम्रता पॅनल तर्फे पाटील चंदा हेमंत तर काँग्रेस प्रणित ग्रामविकास पँनल च्या भालेराव ज्योती संजय तर अपक्ष म्हणून घोलाणे युवराज रामदास, लहासे दिपक दयाराम, व भालेराव युवराज बाळू हे ५ उमेदवार रिंगणात उतरले आहे.  

    तर प्रभाग क्रमांक १ मध्ये ३ जागा साठी ९ उमेदवार आहे यात सर्व साधारण पु गटात पाटील ठकसेन भास्कर, भंगाळे विजय देवराम, सरोदे श्रीकांत सिताराम, साळुंके तेजस खुशाल तर एस सी महिला मधून घोलाणे मीनाक्षी युवराज, पाटील प्रियंका मोहन व वानखेडे रेखाबाई प्रभाकर  तर सर्व साधारण स्री साठी बोरोले प्रियंका कुंदन व भंगाळे हेमांगी चंद्रकांत अशी लढत होणार आहे. 

     प्रभाग क्रमांक २ मध्ये ओबीसी महिला प्रवर्गात मालखेडे हर्षा दिवाकर ह्या बिनविरोध निवडून आले आहे तर उर्वरित २ जागा साठी ५ उमेदवार रिंगणात आहे यात सर्व साधारण जागेवर माळी गोकुळ नारायण ( सतिष माळी  ) तसेच डॉ सागर नीळकंठ चौधरी व ठाकरे गौतम अरुण याच्यात चुरस होणार आहे तर भालेराव अंजली नितिन व भालेराव प्रिती युवराज. 

    प्रभाग क्रमांक ३ मध्ये २ जागा पैकी एस टी प्रर्वर्ग मधून बोरोले ममता संदीप या बिनविरोध निवडून आले आहे तर सर्व साधारण १ जागेवर ३ जण नशिब आजमावत आहे यात नेमाडे जितेद़ सोनजी, लोखंडे महेंद्र रामदास व फेगडे कुंदन माधव हे समोरासमोर आहे. 

     प्रभाग क्रमांक ४ मध्ये शे नजिर शे बशीर, खाटीक अखलाक मजिद व भंगाळे हेमांगी चंद्रकांत हे तिन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे तर प्रभाग क्रमांक ५ मध्ये  ३ जागा पैकी २ जागा यात शाहिद शे महंमद मण्यार व शहिनाबी शे जाबीर  हे बिनविरोध निवड झाली आहे तर एस सी पु १ जागे साठी २ उमेदवार आहेत यात भालेराव शेषराज दिनकर व भालेराव युवराज बाळू याच्यात लढत होणार आहे.

प्रभाग क्रमांक ६ मध्ये ३ जागा पैकी सर्व साधारण महिला या जागेवर महाजन मनिषा अनिल या बिनविरोध निवडून आले आहे तर सर्व साधारण पुरूष जागेवर १ जागेसाठी ३ उमेदवार असले तरी नेमाडे निखिल कैलास यांनी जाहिर माघार घेत सागर भारंबे यांना पाठिंबा जाहीर केला आहे या साठी आता मतपत्रिकेवर ३ नावे असली तरी भारंबे सागर गोपाळ व अपक्ष कोल्हे अजय नारायण यांच्यात लढत होईल तर ओबीसी महिला प्रवर्गात अपक्ष सौ नारखेडे कविता गिरिश व नेमाडे उज्वला किरण यांच्यात लढत होणार आहे एकंदरीत ८ जागा जरी बिनविरोध निवडून आले असले तरी सरंपच व उर्वरित प्रभागातील प्रभावी व मातब्बर उमेदवार मुळे निवडणूकीत आता खरी लढत रंगणार असल्याने केवळ चिनावल च नव्हे तर तालुका व जिल्हा भरात या निवडणूकी कडे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.