Header Ads

Header ADS

भुसावळात अतिक्रमण हटवण्यास प्रारंभ


 भुसावळात अतिक्रमण हटवण्यास प्रारंभ

 लेवाजगत न्युज भुसावळ : शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद होवून वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाल्याने पालिकेने यावल रोडवर गुरुवार, 11 रोजी सकाळी 10 वाजेपासून अतिक्रमण हटवण्यास प्रारंभ केला. राहुल नगरापासून ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत अतिक्रमणावर पालिकेने जेसीबी फिरवत रस्त्यावर ठेवण्यात आलेले फलक जप्त केले तर रस्त्यावर आणून ठेवलेल्या टपऱ्या जेसीबीद्वारे नष् केल्या.

 गांधी पुतळ्याजवळील तलाठी कार्यालयाजवळील दुकानदारांना अतिक्रमित दुकाने पाडण्याचा अल्टीमेटम देण्यात आला असून दुकानदारांनी अतिक्रमण न काढल्यास पालिका अतिक्रमण काढणार असल्याचे प्रांताधिकारी जितेंद्र पाटील म्हणाले.

तार ऑफिस रोडवर कारवाई


शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या यावल रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर गांधी पुतळा ते शहर पोलिस ठाण्यापर्यंतच्या रस्त्यावर व्यावसायीकांनी दुकानाबाहेर बनवलेले बेकायदे ओटेदेखील तोडण्यात आले तर तार ऑफिस रोडवर थकबाकीदारांच्या गाळ्यांना पालिकेकडून सील लावण्यात येत आहे.

दुपारून नाहाटा चौफुली घेणार मोकळा श्वास


भुसावळ पालिकेच्या माध्यमातून रस्त्यावरील गाड्या व्यावसायीकांनी स्वत: हटवून घ्याव्यात यासाठी ध्वनीक्षेपकाद्वारे बुधवारी व्यावसायीकांना सूचना देण्यात आल्यानंतर अनेकांनी स्वतःच अतिक्रमण काढले तर उर्वरीत जामनेर रोडपासून ते नाहाटा चौफुलीपर्यंत दुपारनंतर अतिक्रमण हटवण्यात येणार आहे. व्यावसायीकांनी स्वत: त्यांच्या गाड्या, टपऱ्या काढून घ्याव्यात अन्यथा पालिकेच्या माध्यमातून कारवाई केली जाईल व होणाऱ्या नुकसानीची जवाबदारी व्यावसायीकांची असेल, असे पालिका प्रशासनाने बजावले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.