Header Ads

Header ADS

भाजप नेत्या पूजा दादूची बऱ्हाणपूर येथे आत्महत्या कारण गुलदस्त्यात

 

BJP-leader-pooja-daduchi-suicide-at-Berhanpur-due-to-bouquet

भाजप नेत्या पूजा दादूची बऱ्हाणपूर येथे आत्महत्या कारण गुलदस्त्यात 

लेवाजगत न्यूज बऱ्हाणपूर- मध्य प्रदेश राज्यातील भाजप नेते आणि माजी आमदार यांची मुलगी पूजा दादू हिने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनंतर कुटुंबानी आक्रोश केला. माहिती मिळताच भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी घटनास्थळी जाऊन शोक व्यक्त केला.मध्य प्रदेशातील बुरहानपूर शहरात भाजप नेत्या खकनार पंचायत समिती सभापती पूजा दादू यांनी गळफास लावून आत्महत्या केली. घरच्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी लगेच आरडाओरडा सुरू केला. पूजाला तात्काळ शहरातील खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पूजा दादू या माजी आमदार राजेंद्र दादू यांच्या कन्या होत्या.




BJP-leader-pooja-daduchi-suicide-at-Berhanpur-due-to-bouquet


मिळालेल्या माहितीनुसार, खकनार पंचायत समिती सभापती पूजा दादू यांनी शनिवारी रात्री उशिरा कान्हापूर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीयांनी पूजाला ताबडतोब  बाहेर काढले आणि बुरहानपूरच्या संजय नगर येथील एका खासगी रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. पूजा दादूने असे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस तपास करीत आहेत.भाजप जिल्हाध्यक्ष मनोज लाधवे यांनी सांगितले की, शनिवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास खकनार पंचायत समिती सभापती यांनी गळफास लावून आत्महत्या केली, मात्र अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही. हे आमच्या पक्षाचे  मोठे नुकसान आहे, पोलीस पुढील तपास करत आहेत.माहिती मिळताच खासदारांसह भाजपचे अनेक नेते घटनास्थळी दाखल झाले.

पूजा दादू या खकनार तालुक्याच्या पंचायत समिती सभापती होत्या. सध्या त्यांची मोठी बहीण मंजू दादू या प्रदेश बाजार समितीच्या उपाध्यक्षा आहेत. त्या आमदारही राहिल्या आहेत. त्यांचे वडील कै. राजेंद्र दादू यांनी  नेपानगरमधून आमदार पद भूषवले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.