Header Ads

Header ADS

लेखी आश्वासनानंतर सावदा येथील पत्रकरांचे अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित,तत्काल दुभाजगात कॉक्रीटीकरण सुरू-ताप्ती सातपुडा जर्नलिष्ट फाऊंडेशनला यश

  

After the written-assurance-at-Savada-the-journalists-food-abstinence-movement-is-temporarily-suspended,-immediately-in-bifurcation-cocretization-starts-Tapti-Satpuda-Journalists-Foundation-Success


लेखी आश्वासनानंतर सावदा येथील पत्रकरांचे अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित,तत्काल दुभाजगात कॉक्रीटीकरण सुरू-ताप्ती सातपुडा जर्नलिष्ट फाऊंडेशनला यश 


After the written-assurance-at-Savada-the-journalists-food-abstinence-movement-is-temporarily-suspended,-immediately-in-bifurcation-cocretization-starts-Tapti-Satpuda-Journalists-Foundation-Success


लेवाजगत न्यूज सावदा  -येथील बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाचे काम जलद गतीने पूर्ण व्हावे व सावदा शहरातील दुभाजकासाठी सोडलेल्या जागेत तात्काळ काँक्रिटीकरण करण्यात यावे यासाठी ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वतीने दिनांक १७ रोजी अन्नत्याग उपोषण सावदा येथे बस स्थानकासमोर  करण्यात आले. या आंदोलनाला सावदा शहरातून सर्वपक्षीय पाठिंबा मिळाला. जोपर्यंत लेखी मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असे फाउंडेशनच्या पदाधीकाऱ्यांनी सांगितल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे शाखा अभियंता चंदन गायकवाड व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी व्ही.के. तायडे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु काही एक फायदा झाला नाही.

 त्यामुळे संध्याकाळी चार वाजता चंदन गायकवाड व व्ही के तायडे यांनी लेखी स्वरूपात  ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट फाउंडेशन ला पत्र दिल्यानंतर   उपोषण तात्पुरते सोडवण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, सुरज परदेशी, पंकज येवले ,रावेर बाजार समिती संचालक सय्यद अजगर, डायमंड ग्रुप चे संचालक हारून सेठ,एच पी पेट्रोल पंप चे संचालक हाजी शब्बीर हुसेन हाजी अख्तर हुसेन बोहरी ,तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष दिनेश पाटील, मा. उपनगराध्यक्ष दत्तात्रय महाजन, सिद्धेश्वर वाघुळदे , डॉक्टर अतुल सरोदे ,डॉ प्रियदर्शनी सरोदे ,माजी नगराध्यक्ष हेमांगी राजेंद्र चौधरी, नीता शाम  पाटील ,माजी नगरसेवक फिरोज खान पठाण, नंदा लोखंडे,रमाकांत तायडे,नाना संन्यास,संतोष तायडे, कोचुर येथील उपसरपंच अमोल पाटील, महेश भारंबे,अजय भारंबे यांच्यासह अनेक नागरिकांनी या उपोषणाला पाठिंबा दिला. रावेर यावल तालुका मेडीकल असोसिएशनने देखील या उपोषणाला पाठिंबा दिला होता.महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ शाखा रावेर यांनीही पाठींबा दिला.






यावेळी संबंधित ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे शाखा अभियंता चंदन गायकवाड यांनी लेखी निवेदनात म्हटले आहे की, दिनांक १५ नोव्हेंबर पर्यंत संपूर्ण यावल ते चोरवड पर्यंत खड्डे दाबण्यात येतील व एक फेब्रुवारीपर्यंत डांबरीकरण करण्यात येईल.



 तात्काळ कामाला सुरुवात

कोचुर फाटा ते साईबाबा मंदिरापर्यंत कॉक्रीट करण्याचे काम पूर्ण झाले असून रस्त्याच्या मधोमध दुभाजकसाठी जागा सोडण्यात आली होती. या ठिकाणी मोठमोठ्या चऱ्या पडल्या होत्या या दुभाजकात असलेल्या चऱ्या मध्ये अनेक ठिकाणी गाड्या घसरून अपघात होत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता  व्हीं के तायडे यांनी समाज सुचकता दाखवत या दुभाजकासाठी सोडलेल्या जागेत कॉक्रीटीकरण सुरू झाले,.

 सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे व सहकऱ्यांनी पोलीस बंदोबस्तचोख ठेवला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.