तिला पाहून त्याची नियत फिरली; केळीबागात नेवून महिलेवर अत्याचार
तिला पाहून त्याची नियत फिरली; केळीबागात नेवून महिलेवर अत्याचार
लेवाजगत न्यूज मुक्ताईनगर- तालुक्यातील एका गावातील ३० वर्षीय महिलेचा हात पकडून केळीच्या बागात नेवून अत्याचार केला. एवढेच नाही तर तिचे विवस्त्र फोटो काढून लोकांना दाखविण्याचा धमकी दिल्याचा संपानजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, मुक्ताईनगर तालुक्यात ३० वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. ३ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पिडीत महिला ही गावाच्या शिवारातील रस्त्याने शेताकडून घरी जात होत्या. त्यावेळी गावात राहणारा बाळकृष्ण याने महिलेला पाहिले. तो महिलेच्या समोर उभा राहून रस्ता आडविला. जबरदस्तीने तिचा हात पकडून केळीच्या शेतात नेवून तिच्यावर अत्याचार केला. एवढेच नाही तिर विवस्त्र फोटो मोबाईलमध्ये काढून लोकांना दाखविण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर काही दिवस पीडीत महिलेने हा प्रकार कुणाला सांगितला नाही. अखेर मोठे धाडस करत मंगळवारी १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी बाळकृष्ण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहू करीत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत