Header Ads

Header ADS

आई वाचली पण मुले काळाने हिरावली अन् वाचविणाराही प्राणाला मुकला , बीडमधील घटनेमुळे हळहळ

 

आई वाचली पण मुले काळाने हिरावली अन् वाचविणाराही प्राणाला मुकला , बीडमधील घटनेमुळे हळहळ

दसऱ्यानिमित्त कपडे धुवायला गेले असता दोन चिमुकल्यांसह त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या एकाच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

लेवाजगत न्युज बीड : बीडमध्ये (Beed) दसऱ्यानिमित्त कपडे धुवण्यासाठी जाणं हे दोन चिमुकल्यांच्या जीवावर बेतलं आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्हा या मुलांची आई देखील तिथेच उपस्थित होती. आईने मुलं बुडत असल्याचं पाहून आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली. आईचा आक्रोश ऐकून एका तरुणाने मदतीचा हात पुढे केला पण त्याचाही बुडून मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमंक काय घडलं?

शनिवार (14 ऑक्टोबर) रोजी दुपारी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये ही घटना घडली. केज शहरातील गणेश नगर भागातील वाघमारे आणि घोडके ही दोन्ही कुटुंब शेजारी राहत होती. दसऱ्यानिमित्त कपडे धुण्यासाठी ही दोन्ही कुटुंब गेली होती. केज-बीड रोडवरील रमाई नगरच्या तिरुपती मंगल कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या खदानीवर कपडे धुण्यासाठी गेले होते. कपडे धुवून झाल्यानंतर दुपारी 4.00 वाजताच्या सुमारास  वैष्णवी गजानन वाघमारे वय 12 वर्ष आणि सोमेश्वर गजानन वाघमारे  15 वर्ष दे दोघेही जण पाण्यात बुडाले. त्यांना वाचविण्यासाठी त्यांची आई उषा गजानन वाघमारेने आक्रोश करण्यास सुरुवात केली. त्यासाठी तिने स्वत: पाण्यात देखील उडी मारली. 

आईचा आक्रोश एकून  शेजारी असलेला अविनाश संतोष घोडके वय 18 वर्ष याने पाण्यात उडी मारली. त्याला उषा यांना वाचवण्यात यश आले. पण  सोमवश्वर आणि वैष्णवी यांना वाचवताना खदानीतील पाण्यात बुडून त्याचाही मृत्यू झाला. या घटनेमध्ये  वैष्णवी आणि सोमेश्वर या दोन सख्ख्या बहीण भावा बरोबरच  त्यांना वाचवायला गेलेल्या अविनाश घोडके याचाही मृत्यू झाला. 


वैष्णवी आणि सोमेश्वर ही अगदी सामन्य कुटुंबात राहणारे होते. त्यांचे वडील हे सुतारकाम करत असत. तर अविनाश घोडके हा देखील अत्यंत सर्वसामान्य घरतला होता. त्यांचे केज तालुक्यातील मंगळवार पेठेत चप्पल आणि बुटाचे दुकान आहे. या मुलांच्या मृत्यूमुळे त्यांच्या पालकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच आईच्या डोळ्यादेखत तिची दोन्ही चिमुकली गेल्याने तिने हंबरडा फोडला.  

या संपूर्ण घटनेमुळे केज तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. सणासुदीचे दिवस असल्याने ग्रामीण भागात संपूर्ण घराची स्वच्छता करुन घरातले सगळे कपडे, अंथरुण  धुण्यासाठी नदीवर नेलं जातं. तोच क्रम या दोन्ही कुटुंबांनी केला होता. त्यामुळे सणासुदीच्या दिवसात दोन्ही कुटुंबावर दु : खाचा डोंगर कोसळला आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.