Header Ads

Header ADS

फैजपूरचा तरुण जळगाव येथे ट्रकखाली चिरडून दगावला

 

A young man from Faizpur was crushed under a truck at Jalgaon


फैजपूरचा तरुण जळगाव येथे ट्रकखाली चिरडून दगावला

 लेवाजगत न्यूज जळगाव- शहरातील एमआयडीसीतील कंपनी समोर गहू खाली करून लावलेला ट्रक चालकाने सुरू करून बाहेर काढत असतांना खाली झोपलेल्या क्लिनर चिरडून ठार झाल्याची खळबळजनक घटना बुधवारी १८ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे नोंद झाली आहे. दिपक विनोद मेढे (३८, रा. फैजपूर, ता. यावल) असे मयत क्लिनरचे नाव आहे.




याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एमआयडीसीमधील एका कंपनीसमोर गहू खाली करून  ट्रक उभा होता. त्याच ट्रकच्या खाली त्याच ट्रकचे क्लिनर दीपक मेढे झोपलेले होते. ही बाब चालकाच्या लक्षात आली नाही.  व त्याने ट्रक सुरू करून जागेवरून बाहेर काढला. चाकाखाली कोणीतरी आल्याचे चालकाच्या लक्षात आले त्यावेळी त्याने येऊन पाहिले असता त्याच्या ट्रकवरील क्लिनरच चिरडल्या गेल्याचे दिसले. ही घटना बुधवारी १८ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.  यात क्लिनच्या चेहऱ्याचा पूर्ण चेंदामेंदा झाला असून हात-पायदेखील तुटले. ही घटना घडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. काही वेळातच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनमा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला. मयताच्या पश्चात आई, वडील, विवाहित बहीण, भाऊ असा परिवार आहे. घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात  मयताच्या चुलत भाऊ ने ट्रक चालक शेख मजहर शेख अख्तर याचे विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.