बुऱ्हाणपूर येथून देवीची मूर्ती आणताना ३५ वर्षीय तरुणाचा खाली दबल्याने दुर्दैवी मृत्यू
बुऱ्हाणपूर येथून देवीची मूर्ती आणताना ३५ वर्षीय तरुणाचा खाली दबल्याने दुर्दैवी मृत्यू
लेवाजगत न्यूज जळगांव-नवरात्र उत्सवासाठी देवीची मुर्ती बऱ्हाणपूर येथून मुक्ताईनगर मार्गे जळगाव कडे नेत असतांना अंगावर देवीची मुर्ती पडल्याने जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील ३५ वर्षीय तरूण संजय उर्फ जितू गोपाल कोळी, जोशी वाडा, मेहरूण यांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटनना मध्यरात्री घडली आहे.
याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे मेहरूण परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.
जळगाव येथील मेहरूण परिसरातील जोशी वाडा येथे नवरात्र उत्सवानिमित्त दुर्गा देवी बसवण्यासाठी तयारी झालेली होती. त्याकरिता देवीची मूर्ती मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथून देवीची मूर्ती आणण्यासाठी मंडळाचे काही कार्यकर्ते हे शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी बुऱ्हाणपूर येथे गेले होते. मूर्ती घेऊन येत असताना रात्री बारा वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर तालुक्यातील पुर्णाड फाट्याजवळ देवीची मूर्ती संजय कोळी यांच्या अंगावर पडल्याने अपघातात दाबले गेल्याने त्यांना मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले. कोळी यांच्या कुटुंबियांना भ्रमाणध्वनिवरून माहिती देण्यात आली. त्यावेळी त्यांनी एकच आक्रोश केला. दरम्यान मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.जळगाव एमआयडीसी येथील एका कंपनीमध्ये संजय कोळी काम करीत होता.मयताच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि दोन भाऊ असा परिवार आहे. या अपघाताने मात्र तरुणांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत