Header Ads

Header ADS

3 वर्षांपूर्वी बस अपघातातील मृतांच्या वारसांना दिली 32 लाख 45 हजार रुपये नुकसान भरपाई

 

3 वर्षांपूर्वी बस अपघातातील मृतांच्या वारसांना दिली 32 लाख 45 हजार रुपये नुकसान भरपाई

लेवाजगत न्यूज भुसावळ:- तीन वर्षांपूर्वी बसचा दरवाजा अचानक उघडल्याने प्रवाशाचा खाली पडून जागीच मृत्यू झाल्या प्रकरणी अपघात न्यायालयाने मृताच्या वारसांना ३२ लाख ४५ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश जळगावच्या एसटी महामंडळाला दिले आहे. भुसावळ येथील न्यायालयात चाललेल्या या खटल्यात अर्जदाराने मागणी केलेल्या रकमेपेक्षा २ लाख ४५ हजार रुपये जादा भरपाईचे आदेश दिले. 

 त्यासोबतच कोर्टाने एसटी बस सुविधेबाबत निरीक्षणे नोंदवली आहेत.

 घंटी गुलाबराव ढोलताणी (रा-सिंधी कॉलनी भुसावळ) १७ एप्रिल रोजी भुसावळहून यावलला जाण्यासाठी बसने (क्र. एमएच २० बीएल १६४१) निघाले. ही गाडी यावल हद्दीत पोहोचली असता वळणावर बसचा दरवाजा अचानक उघडून बंटी हे खाली पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पत्रकार शेखर पटेल यांच्या फिर्यादीवरून चावल पोलिसांत बस चालक संजय वासुदेव खलसे (वय ५० यावल) व वाहक जगन्नाथ राजाराम महाजन (रा. यावल) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच या प्रकरणी ढोलताणी यांची पत्नी यांनी भुसावळ अपघात न्यायालयात नुकसान भाई मिळण्यासाठी अर्ज केला होता.


मृतच दोषी असल्याचा महामंडळाचा युक्तिवाद कोर्टाने फेटाळला

या खटल्यात एसटी महामंडळाकडून घटनेला स्वतः विशेष म्हणजे मागणी ३० लाखांची असताना मृत जबाबदार असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. घटनेच्या वेळी मृत बंटी हा कानात इयरफोन घालून बोलत असल्याचे म्हटले. या प्रकरणी मोटार अपघात प्राधिकरण सदस्य श्रीमती एस.एस. सापतनेकर यांनी जर बसचा दरवाजा वाहकाने बंद केला तर तो पडण्याचा प्रश्न नाही असे म्हटले. त्यामुळे अपघात व मृत्यूला वाहक व चालक यांचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे स्पष्ट केले व त्यापेक्षा २ लाख ४५ लाख रुपये अधिक देण्याचे आदेश केले. कामकाज ३ वर्ष २ महिने जळगाव व भुसावळ मोटार अपघात न्यायालयात चालले.



  अर्जदाराची बाजू अॅड. महेंद्र चौधरी, अँड. श्रेयस चौधरी व अँड. हेमंत जाधव यांनी मांडली

कोर्टाने नुकसान भरपाईंतील २५ टक्के रक्कम मृताच्या मुली सोनाक्षी व हनी यांच्या नावावर सज्ञान होईस्तोवर राष्ट्रीयीकृत बँकेत मुदत ठेवीत ठेवण्याचे म्हटले.


कोर्टाने हे नोंदवले निरीक्षण: या प्रकरणी कोर्टाने सविस्तर १९ पानांचा निकाल दिला आहे. त्यात वाहक व चालक यांना कोणताही प्रवासी हा दरवाजात उभा राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेणे अपेक्षित आहे. तसेच एसटी बसला अशा प्रकार से गेट असावे की, त्या दरवाजाचे ऑपरेशन है चालकाच्या हातात हवे. त्यामुळे प्रवाशांची जास्तीत जास्त सुरक्षा घेता येईल.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.