महिलेने 10 मिनिटांत दिला 6 बाळांना जन्म; एक बाळ तर आकाराने तळहाताएवढं लहान
महिलेने 10 मिनिटांत दिला 6 बाळांना जन्म; एक बाळ तर आकाराने तळहाताएवढं लहान
लेवाजगत न्युज :-ब्राझिलमधून (Brazil) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ब्राझिलमधील (Brazil) एका महिलेने 10 मिनिटांत एक, दोन नव्हे, तर तब्बल सहा बाळांना (Babies) जन्म दिला आहे. या सहा बाळांमधील एक बाळ तर आकाराने इतकं लहान आहे की, ते डॉक्टरांच्या तळहातात देखील सहज सामावलं गेलं. महिलेने सोमवारी (2 ऑक्टोबर) कोलाटिना शहरातील रुग्णालयात (Hospital) सहा बाळांना जन्म दिला.
ब्राझिलमधील कोलाटिना शहरात राहणाऱ्या एका महिलेने दहा मिनिटांमध्ये एकाच वेळी सहा बाळांना जन्म दिला आहे. बाळंतीण आणि तिच्या सहा बाळांची प्रकृती उत्तम असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. सहा बाळांची प्रकृती उत्तम असली तरी त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. या घटनेबद्दल ऐकून परिसरतील सर्वच जण थक्क झाले, ही एक अनोखी घटना असल्याचं अनेकांनी म्हटलं.
बाळांच्या स्वागताची पूर्वतयारी
क्वेझिया रोमुआल्डो (Quezia Romualdo) असं बाळंतीण झालेल्या महिलेचं नाव आहे. क्वेझिया आणि तिचे पती मॅगडिल कोस्टा एप्रिलमध्येच आई-बाबा बनणार होते. त्यांना डॉक्टरांनी क्वेझियाच्या पोटात सहा बाळ असल्याची माहिती आधीच दिली होती. या दोघांना पहिली पाच वर्षांची मुलगी देखील आहे.
येणाऱ्या 6 बाळांची काळजी घेण्यासाठी त्यांनी ब्राझिलमधील कोलाटिना शहरातील घर रिनोव्हेट करण्यास घेतलं होतं. पण त्यांना 6 बाळांचे पालक बनण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागली. डॉक्टरांनाही या डिलिव्हरी दरम्यान बरीच मेहनत करावी लागली.
32 डॉक्टरांनी केली डिलिव्हरी
क्वेझिया रोमुआल्डो हिला 7 सप्टेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्यानंतर 4 आठवड्यांनंतर या महिलेने रुग्णालयात 6 बाळांना जन्म दिला. यासाठी डॉक्टरांना महिलेची सर्जरी करावी लागली. क्वेझियाच्या डिलिव्हरीसाठी 32 मेडिकल प्रोफेशन काम करत होते. अनेक डॉक्टर्स, नर्स, फिजियोथेरेपिस्ट, नर्सिंग टेक्निशियन, एनेस्थेटिक आणि पीडियाट्रिशियन यात सहभागी होते.
बाळांची नावं देखील ठेवली
डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, क्वेझियाने सर्जरीच्या दहा मिनिटांमध्ये एकाच वेळी सहा बाळांना जन्म दिला आहे. सर्व बालकं एकदम निरोगी आहेत. डॉक्टरांनी सांगितलं की, एक बाळ तर इतकं छोटं आहे की ते तळहातात देखील सामावलं जातं. सर्व बाळांना श्वास घेण्यास थोडा त्रास होत आहे, पण लवकरच त्यांना बरं वाटेल, कारण त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. जन्म घेताच या सहा मुलांची नावं देखील ठेवण्यात आली आहेत. थियो, मॅटो, लूका, हेनरी, एलोआ आणि माएटे अशी त्यांची नावं ठेवण्यात आली आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत