Header Ads

Header ADS

फडणवीस एक नंबर खोटारडा माणूस जुने व्हिडीओ दाखवत खडसेंची जोरात टोलेबाजी

fadnavis-a-number-fake-man-showing-old-video-of-Khadse-loud-bullying


फडणवीस एक नंबर खोटारडा माणूस जुने व्हिडीओ दाखवत खडसेंची जोरात टोलेबाजी 

लेवाजगत न्यूज जळगाव -ओबीसींना आरक्षण दिले नाही तर मी राजकारण सोडून देईल, अजित पवारांना भाजपमध्ये स्थान नाही, विदर्भ वेगळा झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही, असा घोषणा करणारा भाजप नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे. पण प्रत्यक्षात असे झालेच नाही. हा माणूस खोटारडा आहे, असा घणाघात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला. ते जळगावात सभेला संबोधित करत होते. भाषणाला सुरूवात करण्यापूर्वी खडसेंनी 'लाव रे तो व्हिडिओ' ही स्टाईल वापरून फडणवीसांचे जुने व्हिडिओ दाखवून जोरदार टोलेबाजी केली.


 व्हिडीओ पहा -अजित दादा तुमचा स्वाभिमान कुठे आहे जळगाव येथील सभेत आमदार खडसे यांचा प्रश्न

https://youtu.be/2uJGAytRV7c



एकनाथ खडसे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हा माणूस खोटारडा माणूस आहे. अनेक वल्गना करणारा हा नेता सातत्याने खोटे बोलतो. सद्या देखील मराठा समाजााला मुर्ख बनवण्याचे काम हे सरकार करत आहे.

   सरकारची अवस्था 'दोन बायका फजिती ऐका'

आजच्या सरकारची परिस्थिती ही दोन बायका आणि फजिती ऐका अशी झालेली आहे. कोण कोणाला काही समजत नाही. सरकारमध्ये समन्वय उरलेला नाही.

    अजित दादा तुमचा स्वाभीमान कुठे? 

अजित दादा एक स्मार्ट माणूस, बोलणे तसा वागेल, स्वाभीमानी अजित दादा त्या ठिकाणी निर्णय घ्यायला लागले की त्यांचा निर्णय फडणवीसांनी रद्द केला. दादा आता तुमचा स्वाभीमान कुठे गेला आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, दादा तुम्हाला येथे किती सन्मान होता. यहा तो शेर थे, तुमच्या फाईल घेऊन फडणवीसांकडे जावे लागत असेल तर मग तुमचा स्वाभीमान गेला कुठेय?

   शेतकऱ्यांना वीज मिळेना 

दहा तास तरी वीज मिळते का, शेतकऱ्याला तीन तास देखील वीज मिळत नाही. महागाई वाढली, गॅस सिलिंडर किंमती कमी केले निवडणूक आली म्हणून हे उपक्रम सुरू आहे. सरकारमध्ये समन्वय नाही. जळगाव जिल्हा तर वाऱ्यावर सोडला आहे.

   महाराष्ट्र पेटून उठतोय म्हणून गृहमंत्र्यांना भीती 

जालना येथे पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. पोलिसांच्या या कृतीचा निषेध केला. महाराष्ट्रातील मराठा समाज पेटला, रस्त्यावर उतरला. महाराष्ट्र पेटून उठतोय ही भिती गृहमंत्र्यांना वाटली. म्हणून लाठीचार्ज केल्याबद्दल त्यांनी माफी मागितली. घटना घडली, त्यावेळीच माफी मागितली असती, तर महाराष्ट्र पेटलाच नसता. देवेंद्र फडणवीस यांना माफी मागण्याची सवय करुन घ्यावी लागेल. धनगर आरक्षण देऊ सांगितलं, ते अजून दिलेलं नाही, असे एकनाथ खडसे म्हणाले.

   तोंडी आदेशावर देखील कामं चालत

देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली ही चांगली गोष्ट आहे. तीन दिवस आधी माफी मागितली असती, तर तीव्रता कमी झाली असती, असे खडसे म्हणाले. विजय वडेट्टीवार यांनी म्हटलय की, नार्को टेस्ट केली, तर दूध का दूध, पानी का पानी होईल, त्यावर एकनाथ खडसे म्हणाले की, कोणात्याही मोठ्या घटना ज्यावेळी घडतात, त्यावेळी लेखी आदेश असतोच असं नाही. तोंडी आदेशावर सुद्धा काम कराव लागतं. लाठीचार्ज करायचा आदेश वरिष्ठांकडून आला, हा वरिष्ठ कोण असू शकतो? एखादी घटना घडली की, अंतिम जबाबदारी गृहखात्यावर मंत्र्यावर असते. रेल्वेचा अपघात झाला की, रेल्वे मंत्री राजीनामा देतो. लाठीचार्ज करण्यासाठी मी जबाबदार नाही, असं म्हणणं चुकीच ठरेल असं खडसे म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.