बाबू गेनू मंडळाच्या गणपतीत नितीन देसाई यांनी केलेला उत्तराखंड येथील चार धाम मंदिरा चा देखावा
बाबू गेनू मंडळाच्या गणपतीत नितीन देसाई यांनी केलेला उत्तराखंड येथील चार धाम मंदिराचा देखावा
उरण ( सुनिल ठाकूर ). पुण्याचा नवसाचा गणपती समजला जाणारा गणपती म्हणजे हुतात्मा बाबू गेनू मंडळा चा गणपती. या मंडळाची स्थापना 1970 साली झाली. या मंडळाचे यंदाचे वैशिष्ट्ये म्हणजे स्व. नितीन देसाई यांनी मरणा पूर्वी शेवटचे स्केच केले ते उत्तराखंड येथील चार धाम मंदिर साकारले.गुरुवारी या मंदिराचे स्केच तयार झाले आणि मंगळवारी त्यांचे निधन झाले.
2003 ते 2023 पर्यंत नितीन देसाई यांनी या मंडळा साठी अनेक देखावे साकारले. जे लोकांना पडदयावर लोकांना बघायला मिळायचे ते प्रत्यक्ष लोकांना रस्त्यावर दाखविण्याचे काम या मंडळा ने केले आहे.
यावेळी मंडळा तर्फे 42 फुटी उंच सेट उभारला आहे. वर शंकराची प्रतिमा आहे. मध्ये नंदी, मध्यभागी अमरनाथ देखावा नंतर नवसाला पावणाऱ्या गणेशाची सुबक मूर्ती आहे. या दहा दिवसात अनेक भक्त या नवसाच्या गणपतीच्या दर्शना साठी येऊन नवस बोलण्या साठी धागा बांधतात व व नवस पुर्ण झाल्यावर ते फेडण्याचा साठी येत असतात अशी प्रतिक्रिया बाबू गेनू मंडळाचे अध्यक्ष बाळा साहेब मारणे यांनी प्रतिनिधी शी बोलताना दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत