Header Ads

Header ADS

यावल आगारातील बस कंडक्टरचा कर्तव्यावर असतांनाच मृत्यू

Yaval-Agar-bus-conductor-died-on-duty


 यावल आगारातील बस कंडक्टरचा कर्तव्यावर  असतांनाच मृत्यू

लेवाजगत न्यूज  यावल -आगारातील कार्यरत असलेले वाहक दिलीप नाले हे कर्तव्यावर असतांना अंजाळे भुसावळ दरम्यान एसटी बसमध्ये ह्वदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाल्याची घटना घडली आहे.




     या संदर्भात मिळालेली माहीती अशी की  महाराष्ट्र परिवहन महमंडळाच्या यावल  आगारात सेवारत असलेले वरिष्ठ वाहक दिलीप वासुदेव नाले ( वय ५७ वर्ष राहणार देशमुख वाडा यावल) हे दिनांक ७ सप्टेंबर रोजी नियमीतपणे आपले कर्तव्यावर असतांना साडे पाच वाजेच्या सुमारास यावल भुसावळ एसटी बसने प्रवासी सेवा बजावत होते. दरम्यान, अचानक अंजाळे गावापासुन त्रास जाणवले त्यांना चक्कर येवुन बेशुद्ध झाल्याने त्यांना तात्काळ भुसावळच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रसंगी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.


घडलेल्या घटनेचे वृत्त कळताच यावल आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी तात्काळ आपल्या सहकार्‍यांसह भुसावळ धाव घेत संपुर्ण घटनेची तपशीलवार माहीती घेतली .

     दितीप नाले हे मागील २६वर्षा पासुन यावलच्या एसटी आगारात वाहक या पदावर कार्यरत होते. आपल्या हस्तमुख स्वभावाने ते सर्वाचे परिचित होते. नाले यांच्या सेवानिवृत्तीला अवघ्या दोनच महीन्यांचा कालावधी राहीला असता त्यांचा मृत्यु झाला. त्यांच्या पश्चात कुटूंबात पत्नी,एक मुलगा असा परिवार आहे. नाले यांच्या अशा अकाली निधनाने यावलच्या एसटी आगारात शोककळा पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.