साडे बारा टक्के भूखंड न दिल्यास रेल्वेचे काम बंद पाडण्याचा जासई ग्रामस्थांचा इशारा
साडे बारा टक्के भूखंड न दिल्यास रेल्वेचे काम बंद पाडण्याचा जासई ग्रामस्थांचा इशारा
उरण : (सुनिल ठाकूर )नेरूळ ते उरण दरम्यानच्या रेल्वे मार्गासाठी जासई येथील ३७ शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करण्यात आली असून त्याच्या मोबदल्यात दिले जाणारे साडेबारा टक्के भूखंड न दिल्याने जासई येथे काम बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे . हे काम गुरुवारी बंदचा इशारा पत्रकार परिषदेत दिला आहे.
जासई मधील शेतकऱ्याना मागील २२ वर्षांपासून साडेबारा टक्के भूखंड न दिल्याने गव्हाण ते जासई या मार्गाला जोडणाऱ्या पुलाचे काम बंद करण्यात आले होते. त्यामुळे खारकोपर ते उरण रेल्वे मार्गाचे काम रखडले होते.
खारकोपर ते उरण रेल्वे मार्गाचे काम जानेवारी २०२३ ला पूर्ण करण्याचा इरादा रेल्वे प्रशासनाने जाहीरकेला आहे. त्यासाठी सध्या या मार्गाच्या कामाने वेग धरला आहे. जमिनी सिडकोने संपादीत केल्या आहेत. या जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना साडेबारा टक्के भूखंड देय आहेत. मात्र २२ वर्षे लोटल्या नंतरही आहे. जासई मधील शेतकऱ्यांना सिडको कडून वारंवार झालेल्या बैठकीतून पोलीस यंत्रणा व विविध आस्थापना समोर आश्वासने देऊन ते पूर्ण न केल्याने हे काम बंद करण्यात येणार आहे. याचा सातत्याने पाठपुरावा करून ही सिडकोने दुर्लक्ष करत आहे.
हा आमच्या वर अन्याय आहे. आमचा विकासाला विरोध नाही .मात्र आमच्या हक्काचे साडेबारा टक्के भूखंड महिन्यात न दिल्यास रेल्वे आणि सिडको विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल अशी माहिती जासई ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष घरत यांनी दिली. यावेळी सरपंच संतोष घरत,कामगार नेते सुरेश पाटील,हरीभाऊ म्हात्रे,महादेवपाटील,रमाकांतम्हात्रे,गणेश पाटील,प्रितेश पाटील,बबन पाटील,सुरेश पाटील,माणिक घरत,आत्माराम पाटील,नंदकुमार पाटील,मंजुळा तांडेल,अपर्णाठाकुर,हरी पाटील,हरीशचद्र पाटील,लीलाधर घरत,सचिन पाटील,मोतीराम ठाकूर, आणि इतर सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत