विधी क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्या बद्दल द ग्रेट लीगल माईंड्स ह्या पुरस्काराने ॲड सिद्धार्थ इंगळे यांना सन्मानित
विधी क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्या बद्दल द ग्रेट लीगल माईंड्स ह्या पुरस्काराने ॲड सिद्धार्थ इंगळे यांना सन्मानित
उरण (सुनिल ठाकूर )अतिशय महत्त्वपूर्ण मानला जाणारा , लोकमत ह्या वृत्त पत्रा तर्फे देण्यात येणाऱ्या द ग्रेट लीगल माईंडस ह्या पुरस्काराचे शुक्रवार दिनांक 08/09/2023 रोजी वितरण करण्यात आले.
त्या मध्ये महारष्ट्र तील ज्या वकिलांनी चांगले काम केले आणि गोर गरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले अश्या सिलेक्टेड वकिलांची निवड करण्या त आली होती. रायगड जिल्ह्यातील बहुजन समाजातील लोकांचे प्रश्न समजावून घेवून ते सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील असलेले आणि त्यांना न्याय मिळवून देणारे ॲड सिद्धार्थ इंगळे यांचा त्यात समावेश करण्यात आला होता, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. खरं तर हा सन्मान जरी त्यांना मिळाला असला तरी त्यांचे सहकारी ॲड.सुनिल देवरे, ॲड. विकास शिंदे,ॲड. सुनील तोटावड, ॲड.हेमंत शिंदे,ॲड.उमेश राठोड,ॲड.अक्षय गवळी, ॲड.साहिल मोरे,श्री. शैलेश कोंडसकर, श्री. श्रेयस ठोकळ, श्री.संदेश ठोंबरे यांचा देखील त्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. उरण तालुक्यातील मुक्ता कातकरी ह्या आदिवासी महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी रक्ताचे पाणी केले आहे. सदरहू आदिवासी महिलेकडून कोणतीही फी न घेता उलट स्वतः पैसे खर्च करून ते न्यायालयात लढत आहे आणि ते न्याय मिळवून देणार याची आम्हाला खात्री असून ही केस संपूर्ण भारतात एक land mark केस ठरणार असून त्यांचा नाव लौकिक पूर्ण देशात होणार आहे. असे अनेक विषय म्हणजे JSW ह्या दिग्गज कंपनी कडून प्रकल्प ग्रस्त यांना न्याय मिळवून देणे असेल, नवी मुंबई महानगर पालिका कर्मचारी यांचे कायम स्वरुपी नोकऱ्यांचा प्रश्न असेल, 5000 पोलीस कर्मचाऱ्यांचा प्रश्न असेल , त्यांना न्याय देण्यासाठी दिवस रात्र एक करत आहेत. ॲड सिद्धार्थ इंगळे यांच्या यशात त्यांच्या सुविद्या पत्नी यांचा देखील महत्वाचा रोल आहे. ॲड सिद्धार्थ इंगळे यांना नेहमी प्रेरणा देणारी त्यांची आई सदैव त्यांच्या पाठीशी खंबीर पने उभी असल्यामुळेच काम करताना त्यांना नेहमीच स्फूर्ती मिळत राहते. हा मोठा पुरस्कार मिळाल्या बद्दल उरण सामाजिक संस्थेच्या वतीने प्रा. राजेंद्र मढवी यांनी ॲड. सिद्धार्थ इंगळे आणि त्यांच्या टीम चे अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत