तत्कालीन तलाठी पंडित विठ्ठल झेंडेकर आणि मंडळ अधिकारी एम. के. पाटील यांना होणार अटक
तत्कालीन तलाठी पंडित विठ्ठल झेंडेकर आणि मंडळ अधिकारी एम. के. पाटील यांना होणार अटक
आदिवासी व्यक्तीची जमीन बिगर आदिवासी व्यक्तीस अवैध्य रित्या हस्तांतरित करणाऱ्या तत्कालीन मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना होणार अटक
उरण (सुनिल ठाकूर )मौजे दिघोडे तालुका उरण येथील फेरफार क्रमांक 1281 दिनांक 4/3/1983 अन्वये गोपाळ लहाण्या कातकरी ह्या आदिवासी व्यक्तीची पाच एकर जमीन बिगर आदिवासी व्यक्ती तुळशीराम बाबू घरत, भरत बाबू घरत, अंकुश बाबू घरत, लहू बाबू घरत यांच्या नावे वारसा हक्काने अवैध्य रित्या हस्तांतरित करण्यात आली. ती जमीन सन 1996 मध्ये घरत कुटुंबीय यांनी कैलास सुर्वे यांना विकली.
रायगड जिल्ह्यातील ह्या गाजलेल्या प्रकरणात एट्रोसिटी ॲक्ट अन्वये दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये पनवेल सेशन्स कोर्टाने घरत कुटुंबीय आणि कैलास सुर्वे यांचा जामीन अर्ज फेटाळला असून घरत कुटुंबीय मागील दोन महिन्यांपासून तुरुंगात आहेत.कैलास सुर्वे यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तपास अधिकारी एसीपी पोर्ट विभाग श्री धनाजी क्षीरसागर यांनी उत्कृष्ठ रित्या तपास करून माहिती गोळा केली आहे. त्यामध्ये प्रमुख आरोपी असलेले तत्कालीन तलाठी पंडित विठ्ठल झेंडेकर व मंडळ अधिकारी एम. के. पाटील यांचा तपास लागला असून त्यांना 41( अ) प्रमाणे नोटीस दिलेल्या असून चौकशी साठी बोलावले होते. परंतु ते तेंव्हा पासून फरार असून त्यांचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे त्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिलेले आहेत, अशी माहिती श्री धनाजी क्षीरसागर यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत