स्वतःवर आत्मविश्वास ठेवल्यास असाध्य ते साध्य होते- स्वामी सिब्बू महाराज
स्वतःवर आत्मविश्वास ठेवल्यास असाध्य ते साध्य होते- स्वामी सिब्बू महाराज
लेवाजगत न्यूज जयपुर राजस्थान: भगवंताची व्याकुळ होऊन भक्ती करावी. आईची मुलाविषयी ओढ, पत्नीची पतीविषयी ओढ, आसक्तांची विषयाविषयी ओढ जसी असते तशी परमेश्वराविषयी भक्तीची ओढ पाहिजे. समुद्रात बुडणाऱ्या माणसाला जसे समुद्रातून वर कसे येईल, पाण्यातून वर कसे येईल अशी ओढ निर्माण होते, तशी परमेश्वर प्राप्तीसाठीची ओढ निर्माण व्हावी. कोणतीही गोष्ट साध्य करताना स्वतःवर आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. स्वतःवर आत्मविश्वास ठेवल्यास असाध्य ते साध्य होते असे मत स्वामी शिब्बु महाराज ह्यांनी येथे व्यक्त केले. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रवचनकार समाजसेवक अपंग सेवक हभप डॉ. रवींद्र भोळे यांना पुस्तक देऊन सन्मानित करताना वरील मत व्यक्त केले.
हा कार्यक्रम रामकृष्ण मिशन जयपुर येथे पार पडला. यावेळी शीब्बु महाराज पुढे म्हणाले की ज्येष्ठ समाजसेवक अपंग सेवक डॉ. रवींद्र भोळे हे माझे बालमित्र असून ते सामाजिक धार्मिक, अध्यात्मिक, वैद्यकीय, नैसर्गिक आपत्ती कार्य, वृक्षारोपण ,इत्यादी विविध क्षेत्रात समर्पित भावनेने सेवा वृत्तीने कार्य करीत आहेत. त्यांचे हे रचनात्मक कार्य महान आहे असे मत व्यक्त केले. ह्यावेळी जेष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे म्हणाले की रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद यांच्या विचारधारणेतून रामकृष्ण मठ करीत असलेले कार्य हे मानव जातीच्या पुनरुस्थापनासाठी, राष्ट्र निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. स्वामी शिब्बू महाराज उर्फ एकनिष्ठ नंदाजी महाराज हे आमच्या भूमीतील भूमिपुत्र असल्यामुळे त्यांच्याविषयी आम्हाला अभिमान आहे. त्यांचे हे आध्यात्मिक कार्य भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल असे मत व्यक्त केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत