शरीआ ग.स.पतपेढी देणार ४टक्के व्याज दराने कर्ज - वार्षिक सभेत अध्यक्ष गौस खान यांची घोषणा
शरीआ ग.स.पतपेढी देणार ४टक्के व्याज दराने कर्ज - वार्षिक सभेत अध्यक्ष गौस खान यांची घोषणा
लेवाजगत न्यूज जळगाव- जळगावयेथे रविवार रोजी इकरा एच जे थीम कॉलेज मेहरूनण पतपेढीचे अध्यक्ष गौस खान हबीबुल्ला खान यांच्या अध्यक्षतेखाली शरीआ मुस्लिम गव्हर्नमेंट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सावदा या पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली . सभेत संचालक मंडळातील सै.नफीस, असलम खान, मुजीबुर्रहमान, आसिफ खान, रईस खान, कुरैशी इलियास शेख, जावेद हबीब , शेख,तडवी महेरबान खा, इफतेखार शेख, सै अफजाल अहमद , कमालुददीन शेख, गझाला मॅडम, अफशा मॅडम, रईस शेख, मजसरूददीन शेख, ऐनुददीन शेख व जळगाव जिल्ह्यातील रावेर,यावल,साकळी, बोरनार, एरंडोल, धरणगांव, पाचोरा , जळगांव, नशिराबाद , न्हावी, मारूळ, रसलपुर, चिनावल, सावदा व विविध ठिकाणचे सभासद उपस्थित होते . सभेची सुरुवात कुरान पठणाने मुजीबूर रहमान शेख मुसा यांनी केली, प्रस्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष सय्यद नफीस अहमद अ.रजजाक यांनी केले.
उपस्थितांचे स्वागत संस्थेचे संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आले. सदरील सभेत पतपेढी स्थापनेवेळी सुरुवातीचे संचालक जे आज आपल्या सेवेतून सेवानिवृत्त झाले आहे अशा एकूण बारा निवृत्त सभासदांचे प्रशस्तीपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व विशेष कौतुक करण्यात आले. या सभासदांमध्ये सै. अफजाल अहमद इकबाल अली मारूळ, शेख नईम शेख रऊफ रावेर, मसर्रत सलमा अतिक अहमद जळगाव , शेख लतीफ शेख महेताब जामनेर, सै.इकबाल सै भिकन - रावेर, शकील खान शब्बीर खान चिनावल, फीरोज खान शब्बीर खान - चिनावल , मरहुम अनीस खान शफी खान- सावदा, मरहुम शेख नदिम शेख रऊफ - चिनावल , मरहुम शेख अलीम शेख भिकन - रावेर व कर्मचारी सुनील नवगाळे या सभासदंचे प्रशसती पत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आले. तसेच संचालिका गजाला तबससुम , मजहर सर जामनेर, आसिफ सर जामनेर यांना विविध संस्था तर्फे आदर्श शिक्षिक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सत्कार करण्यात आले.खेळी मेळी च्या वातावरणात सर्व विषय एक मताने मंजुर करण्यात आले.
सभेचे सूत्रसंचालन देश पातळीचे सुविख्यात सूत्रसंचालक साबीर मुस्तफा आबादी यांनी तर नात पठण कमाल सर यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष गौस खान यांनी विषय मांडणी व अध्यक्षीय भाषणात सर्व सभासदांना संस्थेची यशस्वी वाटचालबद्दल शुभेच्छा दिल्या व संस्था प्रगतीपथावर व उन्नतीवर नेण्यासाठी सर्व संचालक मंडळाच्या मदतीने नेहमीच प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले आपल्या मनोगतात अध्यक्ष यांनी जिल्हाभरातील उर्दू शाळेचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी शरीआ पतपेढीचे सभासदत्व स्वीकारून पतपेढीला उंचावण्यासाठी व बळकट करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन केले आहे. शरीआ पतपेढी आपल्या सभासदांना चार टक्के दराने कर्जपुरवठा करेल. तसेच वर्गणी आतील कर्ज दोन टक्के दराने आपल्या सभासदांना दिला जाणार आहे सदरील व्याजदर किंवा सर्विस चार्ज हे संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात कमी सर्व्हिस चार्ज/ व्याजदर आहे असे बोलताना गौसखान यांनी गौरवोद्गार काढले. उपस्थितांचे आभार संस्थेचे संचालक रईस खान सुबहान खान यांनी मानले व अध्यक्षकांच्या परवानगीने सभा संपली असे जाहीर करण्यात आले.उपस्थित सभासदां साठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत