Header Ads

Header ADS

सावद्यात जन्माष्टमीला सुश्राव्य भजनांचे सादरीकरण

Sawadya-Janmashtamila- presentation of beautiful-bhajans


 सावद्यात जन्माष्टमीला सुश्राव्य भजनांचे सादरीकरण

लेवाजगत न्यूज सावदा-येथील श्री स्वामीनारायण मंदिर व श्रीकृष्ण मंदिरात आणि वंजारवाडी येथील राधाकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी भक्तिभावाने साजरी करण्यात आली.

     गुरुवारी रात्री गांधी चौकातील श्रीकृष्ण मंदिर व विठ्ठल मंदिर, वंजारवाडी येथील राधाकृष्ण मंदिरात शेकडो भाविकांनी श्रीकृष्णाचा जयजयकार केला.    



 

       शुक्रवारी श्री स्वामीनारायण मंदिरात रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत गुजराती, हिंदी, मराठी भजनांचा कार्यक्रम संपन्न झाला. मंदिरातील विलोभनीय व सुंदर अशा श्री हरि कृष्ण महाराज व राधाकृष्ण देव यांच्या मूर्तीला आभूषण,वस्त्रालंकाराने साज श्रुंगार करण्यात आला. सजवलेल्या पाळण्यात बाळकृष्णाला बसवण्यात आले. रात्री १२ वाजता श्रीकृष्ण भगवंतांचा जन्मोत्सव साजरा झाला. त्याआधी भगवंतांचा अभिषेक फैजपूर येथील तेजपाल चौधरी यांच्या हस्ते झाला. सत्यप्रकाश स्वामी यांनी पौरोहित्य केले. यावेळी भाविक भजन, कीर्तनात मंत्रमुग्ध झाले होते. स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदास, श्री श्रीजीस्वामी, अनंतप्रकाशदास, लक्ष्मीनारायण स्वामी, सत्यप्रकाशस्वामी, मंदिराचे विश्वस्त चंद्रशेखर पाटील, धनंजय चौधरी, शिवाजी भारंबे यांच्यासह भाविकांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.