सदाचारी समाज निर्मिणारे खान्देशरत्न - शास्त्री भक्तीकिशोरदास (स्वामीनारायण गुरुकुल सावदा - उपाध्यक्ष आणि सावदा स्वामिनारायण मंदिर कोठारी )
सदाचारी समाज निर्मिणारे खान्देशरत्न - शास्त्री भक्तीकिशोरदास (स्वामीनारायण गुरुकुल सावदा - उपाध्यक्ष आणि सावदा स्वामिनारायण मंदिर कोठारी )
भारतीय संस्कृतीला हजारो वर्षांचा इतिहास आहे. विश्वात भारतीय संस्कृती ही आदर्श संस्कृती आजही मानली जाते. परंतु हा विरोधाभासच म्हणावा लागेल की एकीकडे पाश्चिमात्य लोकांना आपल्या संस्कृतीचे महत्व पटून त्यांच्यातील काही लोक आपली संस्कृती खुल्या मनाने स्वीकारत आहेत तर आपल्यातीलच काही लोक आधुनिकतेच्या नावाखाली पाश्चिमात्य संस्कृतीचे गोडवे गात व अनुकरण करत आपल्या पुरातन संस्कृतीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करीत असतात. पण हे मान्यच करावं लागेल की जेव्हाही जगावर संकट आले आहे तेव्हा पुरातन भारतीय संस्कृतीनेच या संकटातून तारले आहे. म्हणून आपली आदर्श आणि महान संस्कृती टिकली पाहिजे ये ध्येयाने प्रेरित सदाचारी समाजाच्या निर्मितीसाठी खान्देशरत्न शास्त्री भक्तीकिशॊरदास यांनी आपले संपूर्ण जीवन वाहून घेतले आहे.
बालपण आणि शिक्षण -: शास्त्री श्री भक्तीकिशोरदासजी यांचे जन्माचे नाव धनपाल असे होय. त्यांचा जन्म ९ सप्टेंबर १९८१ रोजी सदाचार संपन्न, श्रद्धावान, संस्कारी कुटुंब अशी ओळख असलेल्या श्री. योगराज दिगंबर चौधरी व सिंधुताई योगराज चौधरी यांच्या कुटुंबात यावल तालुक्यातील भालोद येथे झाला. ''मुलाचे पाय पाळण्यात दिसतात'' असे आपल्याकडे म्हटले जाते. मुल मोठे झाल्यावर काय होणार याचा अंदाज काही अंशी त्याचे बालपणाचे आचरण आणि वागणे व स्वभाव कसा आहे या वरून केले जाते.
शास्त्री भक्तीकिशोरदासजी बालपणापासूनच तेजस्वी व शांतीप्रिय स्वभावाचे होते. अगदी लहान असल्या पासूनचत्यांचा कल धार्मिक, सामाजिक व भगवान सेवा यांचेकडेहोता. यावरून ते मोठेपणी कदाचित अध्यात्मिक, सांप्रदायिक आणि धार्मिक क्षेत्रात काही तरी दिव्य काम करतील असा अंदाज त्यांचे पालक आणि भोवतालची मंडळी करीत असे. लहानगे धनपाल यांचे प्राथमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल भालोद येथे झाले. त्यांचा परिवार स्वामिनारायण पंथाचा अनुयायी असल्याने श्रीस्वामिनारायण मंदिरात नेहमी येणे जाणे होते, गुरु सद्गुरु शास्त्री श्रीधर्मप्रसाददासजी यांचे त्याच्यावर उत्तम संस्कार लाभले असल्याने शास्त्री श्रीभक्ती किशोरदासजी यांचे आजोबा दिगंबर व आजी तुळसाबाई यांची इच्छा अशी होती की, घरातील एका व्यक्तीने आपले जीवन संप्रदायीक सेवेसाठी व्यतीत करावे.
सांप्रदायिक जीवनाचे संस्कार , प्रशिक्षण व प्रवेश -: असे म्हणतात की आपल्या आयुष्यात जे काही घडते ते सर्व लिखित असते. त्या प्रमाणेच मग घटना, परिस्थिती घडत आणि बदलत असतात. लहान धनपाल यांच्या बाबतीत हे सत्य ठरले असे आज आवर्जून सांगावेसे वाटते.
आई-वडिलांची इच्छा व धनपाल यांची धार्मिक क्षेत्राकडे आवड असल्याने योगराज चौधरी यांनी त्यांना इ.स. जून १९९३ मध्ये गुरु शास्त्री धर्मप्रसाददासजी यांच्या सोबत वडताल (गुजरात) येथे पाठविले. तेथे शास्त्री भक्तीकिशोरदासजी गुजरात मध्ये गांधीनगर येथे शास्त्री ज्ञनप्रकाशदासजी यांच्या सानिध्यात राहून डबल ग्रॅज्युएशन पूर्ण केले. १९९४ मध्ये त्यांना स्वामीनारायण संप्रदायाची दिक्षा देण्यात आली. त्यांनी शास्त्री धर्मप्रसाददासजी यांच्या मार्गदर्शनाखाली काही वर्षे संप्रदायीक शिक्षण पूर्ण केले. ते १९९७ मध्ये श्री स्वामिनारायण गुरुकुल, गांधीनगर (गुजरात) येथे गेले. तेथे शास्त्री हरीप्रकाशजी, शास्त्री ज्ञानप्रकाशजी व सद्गुरू शास्त्री भक्तीप्रकाशजी यांच्या सान्निध्यात राहून व त्याच्या मार्गदर्शनाखाली पुढील शिक्षण पूर्ण केले. बनारस हिंदू विद्यापीठाची आचार्य परिक्षा (एम. ए.) वेदांत विषयात प्रथम क्रमांकाने पदवी प्राप्त केली. व त्यांना सुवर्णपदक मिळाले. सोमनाथ संस्कृत विद्यापीठ (गुजरात) येथून आचार्य परिक्षा (एम. ए.) व्याकरण विषयात द्वितीय क्रमांकाने पदवी प्राप्त केली. त्यांनी शास्त्री व आचार्य या पदासाठी ९ वर्षांचा अभ्यासक्रम अतिशय मेहनत घेऊन पूर्ण केला. सदर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते इ.स.२००७ मध्ये सावदा येथे वास्तव्यास आले. तेथे शास्त्री भक्तीप्रकाशदासजी यांनी श्री स्वामिनारायण गुरुकुल संस्था सुरु केली. त्या संस्थेचे शास्त्री श्री. भक्तीकिशोरदासजी उपाध्यक्ष म्हणून काम करीत आहेत.
विविध क्षेत्रात अमूल्य योगदान -:
सांप्रदायिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात जरी कार्यरत असले तरी शास्त्री श्रीभक्तीकिशोरदासजी हे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक इ. क्षेत्रात देखील भरीव असे कार्य करीत आहेत. त्यामुळे केवळ सांप्रदायिक क्षेत्रातच नव्हे तर विविध क्षेत्रातील कामांमुळे त्यांची प्रतिमा ही सर्वांसाठीच आदरणीय आणि मानवतावादी व्यक्ती अशी आहे.
सामाजिक कार्य –:
शास्त्री श्रीभक्तीकिशोरदासजी खेडोपाडी जाऊन व्यसनमुक्ती या विषयावर नियमित प्रबोधन करीत असतात. तसेच व्यसनी व्यक्तींना मार्गदर्शन करून त्यांना व्यसनापासून दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कुटुंबात जर एक व्यक्ती व्यसनी असेल तर संपूर्ण कुटुंबात ताण-तणाव आणि मानसिक आजारासारख्या गंभीर समस्या निर्माण होत राहतात. सदाचारी, निरोगी समाजाची निर्मिती करायची असेल तर व्यसनमुक्त समाज निर्माण केले पाहिजे अशी त्यांची धारणा आणि प्रयत्न आहेत.
शैक्षणिक व धार्मिक कार्य –:
शिक्षणाने माणूस शहाणा होतो आणि धार्मिक शिक्षणाने सदाचारी समाजाची निर्मिती होते. म्हणूनच श्री. स्वामिनारायण गुरुकुल संस्था या संस्थेच्या माध्यमातून शास्त्री श्री भक्तीकिशोरदासजी यांनी तब्बल १४०० विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत धार्मिक व सत्संगाचे संस्कार देणे, त्यांना भारतीय संस्कृती व मातृदेव, पितृदेव, आचार्यदेव व गुरुदेव यांचा महिमा समजावून सांगतात. भागवत कथा, रामकथा, श्रीमद्भगवदगीता, शिवमहापुराण, देवी भागवत व अन्य ग्रंथांची साप्ताह पारायणे सातत्याने करीत असतात. गुरुकुलच्या माध्यमातून लहान मुलांसाठी व युवकांसाठी धार्मिक शिबिराचेआयोजन करतात.
साहित्य क्षेत्रात कार्य –:
विवेकवादी समाजाची निर्मिती ही प्राकृत विचारांनीच शक्य आहे. आणि या विचारांच्या निर्मितीसाठी साहित्य हे रामबाण औषध आहे. म्हणूनच साहित्य क्षेत्रात देखील शास्त्री श्रीभक्तीकिशोरदासजी यांनी भरीव कार्य केले आहे. १७६२७ संस्कृत श्लोक असलेल्या श्री सत्संगी जीवन नामक ग्रंथ जो २५० वर्षांपासून लिहिला गेला आहे. पण त्याचे आतापर्यंत मराठीमध्ये अनुवाद नसल्याने त्याचा मराठी अनुवाद करून पुस्तक प्रकाशित केले. तसेच स्त्रोतावली, कीर्तनमाधुरी, याज्ञवल्क्य स्मृती, हरीगीता, शिक्षापत्री पंचरत्न (मराठी), भगवान स्वामिनारायण यांचे संक्षिप्त जीवन चरित्र इ. पुस्तकांचे प्रकाशन केले आहे.
गौरव पदक –: शास्त्री श्रीभक्तीकिशोरदासजी यांना आजवर अनेक गौरव पदक प्राप्त झालेली आहेत. ही पदके जणू त्यांच्या कर्तृत्व आणि पात्रतेचीच पोचपावती आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांना आजवर प्राप्त झालेले गौरव खालीलप्रमाणे आहेत.
१) बनारस हिंदू विद्यापीठाची वेदांत विषयात आचार्य परीक्षेत(एम.ए.) प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याने गुजरात सरकारने तत्कालीन राज्यपाल श्री. नवल किशोर शर्मा यांचे हस्ते सुवर्ण पदक देऊन गौरव करण्यात आला.
२) सोमनाथ संस्कृत विद्यापीठाची आचार्य परीक्षेत (एम. ए.) व्याकरण विषयात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यानिमित्ताने त्यांना गौरव पत्र देऊन गौरवण्यात आले.
३) श्री. भक्ती किशोरदासजी हे त्यांच्या कार्यक्षेत्रात भरपूर प्रयत्न करून स्वकर्तृत्वाने, कुशल नेतृत्वाने समाज उपयोगी कार्य करीत असतात.
४) प्रज्ञा व प्रतिभेचा संपूर्ण क्षमतेचे कोणतेही सत्कार्य करणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. स्वयंशिस्त, स्वयंभिस्त, अचूक विचार, कृतज्ञता व उत्तम चारित्र या गुणांच्या बळावर त्यांनी समाज सेवेचे व्रत घेतले आहे.
पुरस्काराने सन्मानित -:
१) तरुण भारत दैनिक वृत्तपत्राने यांनी ''खान्देश रत्न'' पुरस्काराने केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचे हस्ते गौरविण्यात आले.
२) सकाळ दैनिक वृत्तपत्राने ''एक्सलन्स'' पुरस्काराने गौरविण्यात आले
मराठी अनुवाद करून प्रकाशित केलेले ग्रंथ -:
१) श्रीसत्संगिजीवनम् (संस्कृत पाच खंड). २) वचनामृतम् (प्रासादिक वाणी गुजराती). ३) याज्ञवल्क्य स्मृती (प्रथम अध्याय संस्कृत). ४) स्तोत्रावली (संस्कृत). ५) कीर्तन माधुरी (गुजराती). ६) वात्सल्यामृतम् (गुजराती). ७) श्रीहरिगीता (संस्कृत)
संपादकीय प्रकाशन -:
१) श्रीस्वामीनारायण भगवान यांचे संक्षिप्त जीवन
चरित्र. २) शिक्षापत्री. ३) श्रीकष्टभंजन हनुमानजी महिमा.
★ लेखन -:
१) श्रीस्वामीनारायणचरित्र (भाग १). २) १७५०० संस्कृत श्लोक व पाच खंड असलेला श्रीसत्संगिजीवनम् ग्रंथ हिंदी भाषेत अनुवाद.
व्याकरणाचार्य शास्त्री श्री भक्तीकिशोरदासजी यांचा आज जन्मदिवस त्यानिमित्त त्यांना शतशः नमन:
खेमचंद पाटील (मुंबई)
मो. नं. ९४२२५५२२२४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत