Header Ads

Header ADS

अल्पवयीन मुलीवर लग्नाचे अमिषाने बलात्कार

 

Rape-of-a-minor-girl-for-marriage

अल्पवयीन मुलीवर लग्नाचे अमिषाने बलात्कार

 वृत्तसंस्था पुणे- एका १७ वर्षाचे मुलीसाेबत प्रेमसंबंध निर्माण करुन तिला तुझ्याशी लग्न करणार असल्याचे सांगत एका तरुणाने तिच्याावर वारंवर शाररिक संबंध ठेवले. याप्रकरणी पिडित मुलीचे ४०वर्षीय आईने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर, आराेपी माेनेश शांताराम चव्हाण (वय-२६,रा.काेंढवे, धावडे,पुणे) या आराेपीला उत्तमनगर पोलिसांनी अटक केली आहे. 




     सदरचा प्रकार जून २०२३ ते ऑगस्ट २०२३ यादरम्यान घडला आहे. आराेपीने पिडित मुलीशी माेबाईलद्वारे बाेलणे करुन व ओळख वाढवून आपण लवकरच लग्न करणार आहे असे अमिष दाखवून ती अल्पवयीन असताना देखील तिचे साेबत वारंवार शारिरिक संबंध केले आहे. याबाबत पुढील तपास उत्तमनगर पोलिस करत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.