Header Ads

Header ADS

पोस्कोतील संशयित आरोपीचा भुसावळ सत्र न्यायालयने अखेर फेटाळला जामीन

Posco-suspect-accused-Bhusawal-sessions-court-finally-rejected-bail


 पोस्कोतील संशयित आरोपीचा भुसावळ सत्र न्यायालयने अखेर फेटाळला जामीन

लेवाजगत न्यूज सावदा  :- रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित ॲंग्लो उर्दू हायस्कूल मध्ये संचालक तथा शाळा समिती चेअरमन अक्रम खान अमानुल्ला खान वय.४८ या दुर्योधन प्रवृत्तीच्या पुरुषाने १३ वर्षीय शाळकरी बालिकेचा शाळेत वाईट हेतूने अतिशय घृणास्पद व कीळसवानी पद्धतीने विनयभंग केल्याप्रकरणी तो गेल्या १ महिन्या पासून जिल्हा कारागृहात बंदिवान असताना यादरम्यान त्यांनी जामीन मिळावा म्हणून भुसावळ सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.


Posco-suspect-accused-Bhusawal-sessions-court-finally-rejected-bail


सदर जामीन अर्जावर दि.११ सप्टेंबर रोजी न्यायालयात आरोपीचे वकील,फिर्यादीचे वकील सह सरकारी वकील यांनी आपापल्या पद्धतीने जोरदार युक्तिवाद केला.यानंतर आज १२ ऑगस्ट रोजी संशयित आरोपी अक्रम खान अमानुल्ला खान याचा जामीन अर्ज अखेर भुसावळ सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यांनी फेटाळलेला असून त्या संशयिताचा अखेर मुक्काम जिल्हा कारागृहात आहे. 

फिर्यादी पिढीतेच्या वतीने भुसावळ येथील ॲड.सुचिता एन.बैसवाल यांनी तर संशयित आरोपी अक्रम खान तर्फे जळगाव येथील ॲड.अकिल इस्माईल यांनी काम पाहिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.