Header Ads

Header ADS

खिरोदा येथे शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन लेवाजगत न्यूज खिरोदा-

 

Khirōdā-yēthē-śaikṣaṇika- sāhitya-pradarśanācē-udghāṭana

खिरोदा येथे शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन लेवाजगत न्यूज खिरोदा- येथील अध्यापक विद्यालयात जळगाव जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था जळगाव येथील प्राचार्य माननीय डॉक्टर अनिल झोपे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा आमदार माननीय श्री शिरीषदादा चौधरी उपस्थित होते . मा.डॉ .अनिल झोपे सरांनी छात्र अध्यापकांनी बनवलेल्या शाडू  माती पासून बनवलेले गणपती व इतर शैक्षणिक साहित्य चे परीक्षण केले व शैक्षणिक साहित्य निर्मितीची गरज का आहे हे स्पष्ट केले . 



    मा.अनिल झोपे साहेब यांनी आपल्या भाषणात सांगितले की मी या अध्यापक विद्यालयातील माजी विद्यार्थी होतो आणि माझ्या जीवनाला कलाटणी देणारे हे विद्यालय आहे आणि इथूनच माझ्या जीवनाची घोडदौड सुरू झाली या पंचक्रोशीमध्ये पूज्य बाळासाहेबांनी शिक्षणाचे रोपटे  लावले आज त्याचे वटवृक्षांमध्ये रूपांतर झालेले आपणास पाहावयास मिळते आणि ही माझ्यासाठी खूप गौरवाची व अभिमानाची गोष्ट आहे की मी या विद्यालयाचा माजी विद्यार्थी होतो माझे संपूर्ण व शिक्षण या संस्थेमध्ये झालेले आहे आणि म्हणून मी आज  प्राचार्य या मोठ्या पदावरती विराजमान झालेलो आहे हे सर्व श्रेय मी पूज्य बाळासाहेब चौधरी यांना देतो .शैक्षणिक साहित्य प्रदर्शनात मॅजिक बॉक्स ,डायमंड शेप ,  कार्यालयीन उपयोगाकरिता पुठ्ठ्यापासून फाईल इ. साहीत्य प्रदर्शनात मांडण्यात आलेले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शिरीष दादा यांनी सांगितले की सरकार नोकर भरती मध्ये उदासिनता दाखवत आहे , तरुणांच्या भविष्यासाठी आम्ही संस्थाचालक प्रयत्न करू, आधुनिक युगात अशा प्रकारची शैक्षणिक साहित्य निर्मिती वाखाणण्याजोगी आहे आजच्या डिजिटल युगात बहुतांशी तरुणांचा कल रेडीमेड साहित्या कडे असतो. मा.शिरीष दादा व  प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले प्रथम क्रमांक राजश्री कोल्हे द्वितीय क्रमांक रेहना तडवी व उत्तेजनार्थ माहेश्वरी महाजन यांना देण्यात आले .मा.डॉ .डी बी साळुंखे व मा .डॉ सी .डी साळुंखे जिल्हा प्रशिक्षण संस्था जळगाव यांची सुद्धा या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती . याप्रसंगी मा. डॉ .डी .बी साळुंखे साहेबांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विद्यालयाच्या प्राचार्य मा.डॉ सौ प्रतिभा बोरोले यांनी केले .सूत्रसंचालन प्रा. सौ. हेमांगी चौधरी यांनी केले. आभार डॉ.वाय.व्ही.पाटील यांनी केले . याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष मा . कुमार दादा , संस्थेचे सहसचिव मा. डॉ. सौ. अरुणाताई चौधरी, माजी मुख्याध्यापक मा .श्री टी.जी . बोरोले , सप्तपुट ललीत कला महाविद्यालयाचे प्राचार्य अतुल मालखेडे सर, बी.एड.कॉलेज चे प्राचार्य सौ. लता मोरे , ना. गो. पाटील चे मुख्याध्यापक मा. वाय.एल. पाटील , श्रीमती  रोहीणी ताई, माजी प्राचार्य मा.बी.एस तायडे, अध्यापक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर वृंद उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.