कटनी एक्स्प्रेस आजपासून आठ दिवस रद्द तर बस कमतरतेने गौरी गणपती उत्सवात होणार प्रवाशांची गौरसोय
कटनी एक्स्प्रेस आजपासून आठ दिवस रद्द तर बस कमतरतेने गौरी गणपती उत्सवात होणार प्रवाशांची गौरसोय
लेवाजगत न्यूज भुसावळ-पश्चिम मध्य रेल्वे मध्ये पायाभूत सुविधांच्या कामामुळे भुसावळहून सुटणारी भुसावळ-कटनी एक्स्प्रेस ही गाडी आठ दिवस रद्द करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून ब्लॉकमुळे रेल्वे गाड्या रद्द करण्याचे प्रमाण अधिक होत त्यामुळे प्रवाशी त्रस्त झाले आहे.काही आगाराच्या लालपरी बस ही मुंबई येथून कोकणात प्रवाशी नेण्यासाठी गेल्याने त्याचाही परिणाम प्रवाशांना ऐन गणपती उत्सवात सोसावा लागणार आहे.
भुसावळ कटनी एक्सप्रेस (१९०१३) ही गाडी दि. १६ ते २३ सप्टेंबर या काळात रद्द करण्यात आली आहे. तसेच गाडी (१९०१४) ही कटनी भुसावळ एक्सप्रेस गाडी दि. १७ ते २४ सप्टेबर या काळात रद्द करण्यात आली आहे. या गाडीने अप-डाऊन करणारे, व्यापारी हे दररोज या गाडीने जात असतात. सावदा, रावेर, बऱ्हाणपूर, नेपानगर येथे जाणारे प्रवासी या गाडीने जात असतात, रेल्वे प्रशासनाकडून आता ऐन गणपतीच्या काळात बंद केल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होणार आहे. भुसावळ,रावेर,जळगाव व इतर आगाराच्या बस ही गौरी गणपती साठी मुंबई येथे पाठवण्यात आल्याने या मुळेही प्रवाशांची गैरसोय होणार आहे.यामुळे प्रवाशांना पर्याय शोधावा लागेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत