Header Ads

Header ADS

कल्याण मध्ये होणार अखंड वाचनयज्ञ १००००हून अधिक होणार सहभागी

 

Kalyāṇa-madhyē-hōṇāra-akhaṇḍa-vāchanayadyna-10000-hūna-adhika-hōṇāra-sahabhāgī

कल्याण मध्ये होणार अखंड वाचनयज्ञ १००००हून अधिक होणार सहभागी


लेवाजगत न्यूज कल्याण : वाचाल तर वाचाल ही उक्ती आजच्या डिजिटल माध्यमांच्या व सोशल मीडियाच्या वाढत्या आक्रमणामुळे मागे पडली आहे. पण नव्या पिढीला आणि जुन्या पिढीला पुन्हा वाचनाकडे वळवण्यासाठी , त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी कल्याणमध्ये १४ ते १५ ऑक्टोबर रोजी सलग ३६ तास अखंड वाचन यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ योगेश जोशी यांच्या संकल्पनेतून अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानचे वतीने आणि बालक मंदिर संस्था व कल्याण सार्वजनिक वाचनालय यांच्या सहकार्याने या वाचन यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. 


नव्या पिढीने म्हणजे विद्यार्थ्यांचे अभ्यासाच्या व्यतिरिक्तचे वाचन कमी होत चालले आहे वाचणारी जुनी आणि मध्यम पिढीही विविध डिजिटल माध्यमांच्या आहारी जात असल्याने त्यांचे वाचन कमी झाले आहे या सर्वांना पुन्हा वाचनाची  गोडी लागावी यासाठी या तीन संस्थांनी एकत्र येऊन या अखंड वाचन यज्ञाची तयारी सुरू केली असल्याची माहिती अक्षरमंच  सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानचे सचिव व संयोजक हेमंत नेहते यांनी दिली.  


Kalyāṇa-madhyē-hōṇāra-akhaṇḍa-vāchanayadyna-10000-hūna-adhika-hōṇāra-sahabhāgī


कोणत्याही वयोगटातील वाचन प्रेमी यामध्ये सहभागी होऊ शकतात अभिवाचन सत्र, कथा वाचन, ललित वाचन ,काव्य संमेलन, बालसाहित्य वाचन ,महिलांचे काव्यसंमेलन , पत्रकारांचे अभिवाचन , भयकथा व आध्यात्मिक साहित्य वाचन अशा विविध सत्राचे माध्यमातून हा उपक्रम साकारण्यात येणार आहे. उपक्रमात सहभागी होऊन सादरीकरण करणाऱ्या प्रत्येक वाचकाला सहभाग प्रमाणपत्र व पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे सदर उपक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे. 

या वाचनयज्ञात एक हजारहून अधिक वाचक वाचन करण्यासाठी तर दहा हजारहून अधिक रसिक वाचन ऐकण्यासाठी सहभागी होणार आहेत. सदर उपक्रमासाठी कल्याण नागरिक , खर्डीकर क्लासेस , जोशी फायनान्शिअल सर्व्हिसेस, रेगे -दिक्षित सायन्स ॲकॅडमी , हायमीडिया लॅबोरेटरी , शिंदे फाउंडेशन यांचे विशेष सहकार्य मिळणार आहे. सदर उपक्रमात सहभाग विनामूल्य आहे , परंतु पूर्वनोंदणी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा. 

डॉ योगेश जोशी ९७५७०४४६१४

हेमंत नेहते ८७७९६४४९९२

तेजस्विनी पाठक ९८२०७८४००८

भिकू बारस्कर ९३२४२७११४६

भालचंद्र घाटे ९२२४७०३१४५

आरती कुलकर्णी ७७३८६५२०४०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.