Header Ads

Header ADS

पत्रकारांनी रोजगाराच्या विधायक संधी शोधून समाजासाठी स्वाभिमानसिध्द कृतिशील पत्रकारिता करावी-संजय एम.देशमुख

 

Journalists-should-search-for-legislative-opportunities-of-employment-and-do-self-respecting-creative-journalism-for-society-Sanjay-M-Deshmukh

पत्रकारांनी रोजगाराच्या विधायक संधी शोधून समाजासाठी स्वाभिमानसिध्द कृतिशील पत्रकारिता करावी-संजय एम.देशमुख

लेवाजगत न्यूजपरभणी-- लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही कोरोना काळात स्थापन झालेली राष्ट्रीय संघटना असून जाफ्राबादच्या पत्रकार हल्ला प्रकरणातून मराठवाड्यापा सून या संघटनेच्या पत्रकार अन्याय निवारण कार्याची सुरूवात झालेली आहे.पत्रकारिता आणि सामाजिक संकल्पनेतून शिस्तबध्द आणि पारदर्शक वाटचालीने पुढे जाणारी ही संघटना आहे.म्हणून या संघटनेतील सभासदांनी आणि सर्व भावी सभासद पत्रकारांनी संघटनेच्या महाराष्ट्र आणि इतर राज्यातील संपर्काचा उपयोग घेऊन विधायक रोजगाराच्या नव्या संधी शोधाव्यात आणि समाजासाठी कृतिशील पत्रकारितेच्या स्वाभिमानी मार्गाचा अवलंब करावा.पत्रकार आणि सामाजिक कल्याणासाठी कार्यरत या संघटनेचा सभासद संख्या वाढीने एक प्रभावशाली सशक्त संघटना म्हणून अभिनव परिचय सिध्द करावा.असे प्रतिपादन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष व ईलनाचे राष्ट्रीय कार्यकारी सचिव संजय एम.देशमुख यांनी परभणी येथे केले. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या परभणी जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन त्यांचे हस्ते संपन्न झाले.त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.




               याप्रसंगी परभणी जिल्हा शाखेकडून समृध्द पत्रकारिता आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वृत्तपत्रीय आणि डिजीटल मिडिया पत्रकार तथा प्रेस फोटोग्राफर व २५ ते ३० समाजसेवींचा सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र व पुस्तक प्रदान आणि पुष्पहारांनी सन्मानित करण्यात आले.


        यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक यांचेसह केन्द्रीय उपाध्यक्ष,ज्येष्ठ पत्रकार प्रदिपजी खाडे,केन्द्रीय मार्गदर्शक पदाधिकारी व शासनाच्या साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराजजी गावंडे,कर्नाटक राज्य संघटन व संपर्क प्रमुख सौ.सरोजीनी आर्गे,विदर्भ विभागीय संघटक,ज्येष्ठ पत्रकार पंजाबराव देशमुख,रामराव देशमुख हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.तर महाराष्ट्र संघटन,संपर्क प्रमुख भगिरथजी बद्दर, सुभाष पांचाळ,मुकूंद नंद,अनिता ताई सरवदे,मराठवाडा विभागीय संघटन प्रमुख, उत्तम धायजे,राजु कर्डीले,देवानंद वाकळे,जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर,सचिव प्रमोद अंभोरे,डिजीटल मिडिया जिल्हाध्यक्ष राहूल धबाले यांची प्रमुख उपस्थिती होती.


          यावेळी पुष्पराज गावंडे,भगिरथ बद्दर यांनी संघटनेच्या वाटचालीची माहिती दिली तर सौ.अनिताताई सरवदे यांनी परभणी जिल्ह्यातील पत्रकारांमधील एकोप्याचा गौरव करून त्यांनी व सुभाष पांचाळ   संघटनेच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या.

         या कार्यक्रमाला बीड जिल्हाध्यक्ष रामराजे देशमुख,राहूल पुंडगे,  शिवाजी चव्हाण,भारत कनकुटे व बहूसंख्य पत्रकार,प्रेस फोटोग्राफर,डिजीटल मिडिया प्रतिनिधी व समाजसेवी,उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.