शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ, परीक्षेची तारीखही जाहीर
शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ, परीक्षेची तारीखही जाहीर
लेवाजगत न्यूज वर्धा : राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी व आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जाते. १८ फेब्रुवारी २०२४ रोजी राज्यातील विविध केंद्रावर ही परीक्षा घेतल्या जाणार असून १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत अर्ज सादर करता येणार आहे.आता पाचवीच्या विद्यार्थ्यांना पाच हजार तर आठवीच्या विद्यार्थ्यांना साडे सात हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी म्हणून शिक्षण विभागाने अर्ज लवकर भरून घेण्यास सुरुवात केल्याचे म्हटल्या जाते. १ ते १५ डिसेंबर दरम्यान विलंब शुल्कासह अर्ज घेणार. तसेच २४ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत अती विशेष विलंब शुल्कसह विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत.ही शिष्यवृत्ती परीक्षा मराठी, उर्दू,हिंदी, गुजराती,इंग्रजी, तेलगू, कन्नड या सात माध्यमातून घेतली जाते.परीक्षेसाठी शिक्षण विभागाने वयोमर्यादा निश्चित केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत