तगड्या पोलीस बंदोबस्तात सोमवारी चिनावल येथे निघणार गणेश विसर्जन मिरवणूक, ४०० च्यावर पोलिसांचा फौज फाटा
तगड्या पोलीस बंदोबस्तात सोमवारी चिनावल येथे निघणार गणेश विसर्जन मिरवणूक,
४०० च्यावर पोलिसांचा फौज फाटा
लेवाजगत न्यूज चिनावल-संपूर्ण जिल्हाभरात प्रसिद्ध असलेली ७ व्या दिवसाच्या गणेश विसर्जना साठी यावर्षीही प्रशासनाने मोठा तगडा बंदोबस्त लावत आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहे.
सोमवार रोजी मोठ्या उत्साहात गणेश चतुर्थीला उत्सवास सुरुवात झाली ६दिवस सामाजिक धार्मिक क्रीडा असे विविध सामाजिक उपक्रम येथे मंडळांनी साजरे केले त्यास महिलांसह तरुण तरुणींनी मोठा प्रतिसाद देत उत्साहात सहा दिवस पार पाडले.७व दिवस म्हणजे सोमवारी येथे गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात ढोल ताष्यासह, बेंजो व पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघणार आहे चिनावल येथील गणेश विसर्जन मिरवणूक ही परिसरात प्रसिद्ध आहे .या मिरवणुकीत गावातील १५ मंडळे सहभागी होणार आहे ह्या अनुषंगाने गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये या साठी १ महिन्या पासुनच नियोजन करीत गणेश मंडळ पदाधिकारी व गावातील लोकप्रतिनिधी ,प्रतिष्ठित नागरिक यांना सोबत घेतशांततेत विसर्जन मिरवणूक पार पडावी यासाठी बैठका झाल्या.
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिस प्रशासनाने तगडा बंदोबस्त लावत गावातून रुट मार्च करत जिल्हा पोलिस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, मुक्ताईनगर विभागाचे उपविभागीय पोलिसअधिकारी राजकुमार शिंदे यांचे मार्गदर्शना खाली ररविवारी गावात बंदोबस्त साठीविसर्जन मिरवणूक मार्गावर ३० सी सी टी व्ही कॅमेरे, पूर्ण मार्गावर मरक्यूरी लाईट, फ्लॅट लाईट व्यवस्था, मद्य तपासणी, आर टी ओ पथक यांचे सह स्वतः जिल्हा पोलिस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डी. वाय. एस. पी. राजकुमार शिंदे, सावदा ठाण्याचे सपोनि जालिंदर पळे, उपनिरिक्षक विनोद खांडबहाले यांचे सह २ डी वाय एस पी, सहाय्यक पोलिस निरीक्षक,१५ पोलिस उप निरिक्षक, एस आर पी प्लाँटून, आर सी पी प्लाँटून ,३स्ट्रायकीग फोर्स ,१० फाँरेस्ट कंमाडो, १०० पोलिस कर्मचारी, १०० होमगार्ड, एलसीबी पथक, गोपनीय पथक एवढा मोठा पोलीस फौजफाटा राहणार असून मिरवणुकीवर ड्रोन कँमेरा, दुर्बिण, बी डी एस पथक, डेसिबल मिटर चे लक्ष राहणार आहे. विसर्जन मिरवणुक आनंदाने व शांततेने पार पाडण्याचे आवाहन डीवायएसपी राजकुमार शिंदे ,सावदा ठाण्याचे सपोनि जालिंदर पळे यांनी केले, सदर वेळी चिनावल पोलिस पाटील निलेश नेमाडे हे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत