Header Ads

Header ADS

चांदवडजवळील अपघातात धुळ्याचे चार जण ठार; मृतांत भाजप नगरसेवकाचा समावेश

Four-persons-of-Dhula-killed-in-an-accident-near-Chandwad;-Death-includes-a-BJP-Corporator


 चांदवडजवळील अपघातात धुळ्याचे चार जण ठार; मृतांत भाजप नगरसेवकाचा समावेश

लेवाजगत न्यूज -नाशिकमधील चांदवडजवळ भरधाव कारने कंटेनरला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. यात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका नगरसेवकाचा देखील समावेश आहे. आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.




    मुंबईकडून धुळे येथे जात असताना नाशिकमधील केदराई फाटा येथे नमोकार तीर्थासमोर उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव कारने धडक दिली. मुंबई-आग्रा महामार्गावर हा भीषण अपघात झाला. सर्व मृत प्रवासी हे धुळ्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे. अपघातामध्ये किरण हरिश्चंद्र अहिरराव हे धुळ्याचे नगरसेवकसुद्धा मृत्युमुखी पडले. किरण अहिरराव हे नाशिकच्या तहसीलदार राजश्री अहिरराव यांचे भाऊ असल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली.

   मिळालेल्या माहितीनुसार, कारमधून हे चारही प्रवासी धुळ्याकडे चालले होते. सकाळी सात वाजेच्या सुमारास चांदवडजवळ आले असता नमोकर तीर्थजवळ कार आणि कंटेनरची धडक झाली. यात धुळे येथील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात धुळ्यातील नगरसेवक किरण अहिरराव यांचा समावेश आहे. इतर मृतांची अद्याप ओळख होऊ शकलेली नाही. अपघात घडल्यानंतर सोमा टोल वेज कंपनीचे पथक आणि पोलिस अपघातस्थळी दाखल झाले. या अपघातानंतर काही वेळ महामार्ग ठप्प झाला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.