गणेश उत्सवाचा कुटुंबासह आनंद घ्या , सण, उत्सवात कायदा पाळा : अधीक्षक एम. राजकुमार सावदा येथे शांतता समिती बैठकीमध्ये संवाद
गणेश उत्सवाचा कुटुंबासह आनंद घ्या , सण, उत्सवात कायदा पाळा : अधीक्षक एम. राजकुमार सावदा येथे शांतता समिती बैठकीमध्ये संवाद
लेवाजगत न्यूज सावदा- आपल्या एखाद्या चुकीमुळे संपूर्ण गाव, परिसर, शहराचे वातावरण दूषित करू नका. गणेश उत्सवाचा व गणेश विसर्जन मिरवणुकीचा कुटुंबासह आनंद घ्या, सर्वांनी आपापले सण, उत्सव आनंदाने साजरे करा. देवाधर्माच्या नावावर काहीही चुकीचे करू नका, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी केले. ते सावदा येथील शांतता समितीच्या बैठकीत अध्यक्षीय मनोगतात बोलत होते. व्यासपीठावर महामंडलेश्वर जनार्दन महाराज, कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदास, डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे, राजकुमार शिंदे, प्रांत अधिकारी कैलास कडलग, तहसीलदार बंडू कापसे, किशोर चव्हाण मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकामचे उपविभागीय अभियंता व्ही. के. तायडे, उपकार्यकारी अभियंता जे.एच. लढे, एपीआय जालिंदर पळे, नीलेश वाघ, मंडळांचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, शांतता समितीचे सदस्य, मुस्लिम पंच कमिटी, पोलिस पाटील ,प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
सण, उत्सव फक्त समाजच नव्हे तर देश जोडतात-महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज
महामंडलेश्वर जनार्दन महाराजांनी, उत्सवांना गालबोट लागू नये. एकमेकांच्या श्रद्धेचा आदर व्हावा. सण, उत्सव फक्त समाजच नव्हे तर देश जोडतात, असे सांगितले. शास्त्री भक्तीकिशोरदास, मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी म्हणून राजू पटेल, प्रांत अधिकारी कैलास कडलक, डीवायएसपी राजकुमार शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक जालिंदर पळे यांनी केले. बैठकीत मंडळ पदाधिकाऱ्यांनी अंकलेश्वर बऱ्हाणपूर मार्गावर खड्डे असल्याचा मुद्दा मांडला. पण, सार्वजनिक बांधकामने हा रस्ता महामार्ग प्राधिकरणाकडे असल्याने त्यांच्याशी बोलून मार्ग काढू असे सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत