Header Ads

Header ADS

देशासाठी बलिदान देणारे हे काँग्रेसचेच नेते -बाळासाहेब थोरात

 

Dēśāsāṭhī-balidāna-dēṇārē-hē-cogrēsachēcha-nētē-bāḷāsāhēba-thōrāta


Dēśāsāṭhī-balidāna-dēṇārē-hē-cogrēsachēcha-nētē-bāḷāsāhēba-thōrāta


देशासाठी बलिदान देणारे हे काँग्रेसचेच नेते -बाळासाहेब थोरात

 लेवाजगत न्यूज सावदा - देशासाठी बलिदान करणारे काँग्रेसचेच नेते होते परंतु विरोधी लोकांमध्ये एकही व्यक्ती देशासाठी बलिदान करणारा नाही. जाती-धर्मात माणसा माणसात विभागणी करत मतदान मिळवणे हे विरोधकांचे काम आहे. शासन आपल्या दारी या कार्यक्रमात दाखले आणि रेशन कार्ड वाटपासाठी कोट्यावधी रुपयाची उधळण होत आहे. शासनाने हे सर्व कागदपत्र लाभार्थ्यांना घरपोच द्यावेत तोच खरा शासन आपल्या दारी कार्यक्रम असेल  अशा शब्दात बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे नाव न घेता हल्ला चढवला आहे ते काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बूथ मिळावा कार्यक्रमात मंगळवारी सावदा येथे बोलत होते.

 यावेळी व्यासपीठावर आमदार शिरीष चौधरी जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार माजी खासदार उल्हास पाटील, मा. जिल्हाध्यक्ष संदीप भैया पाटील जिल्हा बँकेचे संचालक विनोद पाटील, शरदराव अहिर नाशिक, आशुतोष पवार, रावेर तालुका काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र पाटील, यावल तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

 श्री थोरात पुढे, आज मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या या प्रचंड कार्यकर्त्यांच्या जोरावर रावेर यावल मतदार संघात विरोधकांची डिपॉझिट जप्त होईल तसेच रावेर यावल तालुक्याला मोठी परंपरा असून अत्यंत आदर असलेले व्यक्तिमत्त्व धनाजी नाना चौधरी व जे टी महाजन या भागाने दिले आहेत दुष्काळ पडला आहे कापूस घरात पडून आहे केळी पडली आहे परंतु सरकार लक्ष द्यायला तयार नाही. रावेर लोकसभा काँग्रेस लढवणार आणि जिंकणारही हवा बदलली आहे 2024 च्या निवडणुकीत भाजपाचा पूर्ण कार्यक्रम होणार आहे असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला

आमदार शिरीष चौधरी म्हणाले की, राज्य सरकारने काँग्रेस पक्षाच्या आमदारांची कामे  अडवून धरली आहेत त्यांचा उद्देश हाच आहे की काँग्रेसच्या लोकांनी कामे केली नाहीत म्हणून त्यांना पाडा असे मतदारसंघात प्रचार करीत आहेत विरोधी पक्षाची लोक सांगत आहे आमच्याकडे या आम्ही तुमचे कामे करतो परंतु आम्ही असं करणार नाही ही लढाई शेवटची आहे असं असं त्यांनी सांगितले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.