देशभरातील संतांनी घेतला प्राकृतिक चिकित्सेचा लाभ- निष्कलंक धाम वढोदे येथे आयोजन
देशभरातील संतांनी घेतला प्राकृतिक चिकित्सेचा लाभ- निष्कलंक धाम वढोदे येथे आयोजन
लेवाजगत न्यूज सावदा :-फैजपूर येथील सतपंथ चारिटेबल ट्रस्ट निर्मित वढोदेतालुका यावल येथील निष्कलंक धाम येथे तुलसी हेल्थ केअर सेंटर मध्ये देशभरातील संत महंतासाठी प्राकृतिक चिकित्सा शुद्धी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात अनेक संतांनी उपस्थिती दिली व प्राकृतिक चिकित्सेचा लाभ घेतला. परमपूज्य श्री जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले की, सामान्य व्यक्ती पेक्षा संतांचा परिवार मोठा असतो व त्यांची व्यस्तता सुद्धा जास्त असते. त्यामुळे त्यांना या चिकित्सेची जास्त आवश्यकता आहे. या शिबिरात जलनीती, शंखप्रकक्षालन,नस्य, कटी स्थान, मठ थेरेपी, वमन, शिरोधारा, सूर्यभाप स्नान, भापस्नान, गरम पादस्नान, फुल बॉडी मसाज, आहार चिकित्सा, योगासन, प्राणायाम, हास्य चिकित्सा, योगनिद्रा, संगीत चिकित्सा अशा अनेक क्रियाद्वारे शरीर शुद्धी केली गेली. सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत या शिबिराचे मोफत आयोजन केले होते अशा प्रकारे संतांसाठी आयोजित झालेले हे पहिलेच उदघाटन शिबिर आहे.
श्री जनार्दन महाराजांनी संतांच्या स्वास्थ्याबद्दल चिंता करून हे आयोजन केल्याबद्दल सर्वांनी त्यांना आशीर्वाद दिले. संपूर्ण शिबिराचे संचलन विश्वप्रख्यात आचार्य डॉ. श्री सचिनजी पाटील यांनी केले. विशेष करून या शिबिराला भारतभरातून राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, ओडिसा, महाराष्ट्र आदी प्रदेशातून या संतांची शिबिरासाठी उपस्थिती होती.
या संतांची होती उपस्थिती --
श्री श्री १००८ श्री माधवाचार्य महाराज मलाड तपोवन मुंबई, जगद्गुरु सतपंथाचार्य ज्ञानेश्वरदासजी महाराज प्रेरणापीठ अहमदाबाद गुजरात, श्री राधे राधे बाबा इंदोर अखिल भारतीय संत समिती संयुक्त महामंत्री, महामंडलेश्वर श्री महंत रामकृष्णदासजी महाराज जगन्नाथ पुरी ओडिसा, प. पू. गोपाल चैतन्य बाबाजी श्री वृंदावन धाम पाल, महामंडलेश्वर श्री महंत रामकृष्ण दासजी महाराज जगन्नाथ पुरी ओडिसा, महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज गादिपती सतपंथ आश्रम फैजपूर, महंत भक्ती चरणदासजी महाराज पंचमुखी हनुमान मंदिर तपोवन पंचवटी नाशिक, महंत काशिदास त्यागी महाराज हजारी हनुमान मंदिर पवासा उज्जैन मध्य प्रदेश, संत श्री छगन बापा बालाशहा मंदिर खंबात गुजरात, महंत शांतीप्रसादासजी महाराज निष्कलंक धाम गुजरात, योग तपोनिष्ठ प्रेमदास बापू पंचवटी दहेगाव गुजरात, प. पू. पुरणचंद्र दासजी महाराज जगन्नाथ पुरी ओडिसा, जानकीदासजी महाराज
निमच म. प्र., हभप धनराज महाराज जगन्नाथ महाराज अंजाळे संस्थान, ब्रज चैतन्यजी महाराज पाल, हभप भरत महाराज म्हैसवाडी, श्री श्यामचैतन्यजी महाराज गुरुदेव सेवाश्रम जामनेर, सर्वचैतन्यजी महाराज सद्गुरु आश्रम अंबाडी प्रकल्प संभाजीनगर, नवनीत चैतन्यजी महाराज वृंदावन धाम पाल, हरिदासजी महाराज अधिकारी मंदिर सिहोर, प. पू. गोपाल कृष्ण चैतन्यजी महाराज सद्गुरु धाम कन्नड, वीरेंद्र मिश्राजी मालाड मुंबई, जानकीदास महाराज नीमच मध्य प्रदेश.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत