Header Ads

Header ADS

जनावरे चोरट्यांची केळवणे परिसरात टोळी सक्रिय दक्ष तरुणांमुळे वाचले कित्येक गुरांचे प्राण

Cattle-lives-saved-by-youth-gang-of-thieves-active-vigilance-in-Kelwane-area


  जनावरे चोरट्यांची केळवणे परिसरात टोळी सक्रिय

दक्ष तरुणांमुळे वाचले कित्येक गुरांचे प्राण


उरण (सुनिल ठाकूर ) केळवणे पनवेल -२१ सप्टे-अजय शिवकर -  पनवेल तालुक्यातील केळवणे व पूर्व विभाग परिसरात बैल, म्हैस, गाय चोरणाऱ्यांची टोळी सक्रिय आहे. कित्येक जनावरे चोरट्यांनी चोरली असल्याची चर्चा भागात होत आहे पोलिस यंत्रणेने याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.  


केळवणे येथील गणेश कोळी हा तरुण गुरूवारी पहाटे दोन अडीचच्या सुमाराला गावाबाहेरील आपल्या घरातून गावात जात असताना चार-पाच अनोळखी इसम गावाबाहेरील बसलेल्या गुरातून टेम्पोमध्ये बैल भरत होते , त्याने याबाबत विचारणा केली असता त्याला धाक देऊन व घाबरवून हुसकावून लावले.. 


जनावरे चोरट्यांची केळवणे परिसरात टोळी सक्रिय  दक्ष तरुणांमुळे वाचले कित्येक गुरांचे प्राण


त्यावेळी त्याने पळत गावात जाऊन गणपती जवळ जागरण करणाऱ्या तरुणांना ही गोष्ट सांगितली असता .वैभव शिवकर, मनोज कोळी, तेजस मोकल, सुरज मोकल, अजित माळी, विनय घरत, मयूर माळी, प्रथमेश पाटील, मार्शल माळी, बंटी पाटील, राधेश्याम पाटील

अशी पंधरा वीस जणांची तरुण मंडळी धावत घटनास्थळी गेली असता  पायातल्या चप्पल टाकून घाबरून  ते भामटे पळून गेले..

गावातल्या या तरुण होतकरी मंडळीं मुळे अनेक गुरांचे प्राण वाचले परंतु गुरे चोरणाऱ्या चोरांनी गुरांना चोरताना अमली पदार्थ  खायला दिलेले असल्यामुळे अनेक जनावरे सकाळी ९ वाजेपर्यंत बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती

झाल्या प्रकारामुळे पोलीस यंत्रणेंने बंदोबस्त करावा अशी ग्रामपंचायत मार्फत मागणी होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.