भुसावळातील विवाहितेची तापीमध्ये उडी घेत आत्महत्या
भुसावळातील विवाहितेची तापीमध्ये उडी घेत आत्महत्या
लेवाजगत न्यूज भुसावळ-शहरातील द्वारका नगर भागातील रहिवासी सुरेखा जितेंद्र वाघमारे या ४४ विवाहितेने तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समोर आले नाही. शनिवारी सायंकाळी त्यांनी तापीनदी पात्रात आत्महत्या केल्यानंतर रविवारी सकाळी यावल तालुक्यातील शेळगाव बॅरेजच्या बॅक वॉटरमध्ये मृतदेह आढळला.
सुरेखा वाघमारे या शनिवारी (दि. २३) सायंकाळी पुस्तक घेण्यासाठी जाते असे सांगून दुचाकीने (एमएच.१९- सीएन. ४४३१ ) घराबाहेर निघाल्या. मात्र, त्या सायंकाळपर्यंत घरी परत आल्या नाहीत. यामुळे कुटुंबीयांनी शोध घेतला. रात्री शहर पोलिसांत हरवल्याची नोंद करण्यात आली. रात्री यावल रोडवरील तापी पुलावर विवाहितेची दुचाकी लॉक केलेल्या स्थितीत आढळून आली होती. रविवारी सकाळी तापी पात्रात शोध सुरू करण्यात आला. त्यात शेळगाव बॅरेजमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. मयूर चौधरी व डॉ. प्रशांत जावळे यांनी शवविच्छेदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत