Header Ads

Header ADS

महामार्ग दुरुस्तीसाठी पत्रकारांची जनतेकरिता आक्रमक भूमिका.. ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट फाऊंडेशनद्वारा रास्ता रोकोची निर्णायक भूमिका ..!





महामार्ग दुरुस्तीसाठी पत्रकारांची जनतेकरिता आक्रमक भूमिका..

ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट फाऊंडेशनद्वारा रास्ता रोकोची निर्णायक भूमिका ..!

लेवाजगत न्यूज सावदा -अंकलेश्वर बऱ्हाणपूर या राष्ट्रीय महामार्गावर  सावदा येथे असलेल्या  साईबाबा मंदिरा जवळच  तसेच एल आय सी  ऑफिस जवळ या दोन ठिकाणी   गेल्या दोन ते तीन वर्षा पासून पावसाने रस्त्याची चाळण झाली असून रस्त्यात मोठ मोठे महाकाय खड्डे निर्माण झाले आहे.या रस्त्याची त्वरित दुरुस्ती व्हावी यासाठी शनिवार सकाळी ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट फाऊंडेशनने वाय पॉईंट वर दोन तास जनतेच्या न्याय हक्का  करीता रस्ता  रोको आंदोलन केले.


Aggressive-role-for-highway-repair-of-journalists-for-the-public-Decisive-role-of-Rastaroko-by-Tapti-Satpuda-journalist-foundation!


    सविस्तर वृत्त असेकी गेल्या दोन वर्षांपासून महामार्गावरील या भागात पावसाळ्याचे पाणी  गड्ड्यात साचलेल्या साचलेल्या पाण्याने रस्ता व खड्डा समजून येत नसल्याने  खड्ड्यात मोटरसायकल घसरून  रोज लहान -मोठ्या स्वरूपाचे अपघात होत असतात या अपघातत होऊन जीवनास मुकावे लागले हे नाकारता येत नाही. असल्याचा इतिहास समोर आहे.   याबाबत  पत्रकार सोशल मीडिया यांनी आपापल्या वृत्तपत्राच्या मध्यमद्वारे  वृत प्रसिद्ध करून या रस्ता दुरुस्तीसाठी   बाबत संबंधित अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपाचे तसेच  तोंडी  नानाविध वेळा तक्रारी करून सूचित  केले मात्र   रस्ता समस्या बाबत संबंधित अधिकारी कोणतेच सोयरे सुतुक नसल्याने  स्थानिक पत्रकारांनी थेट दी २२ रोजी  रात्री संबंधित अधिकारी यांचेशी आंदोलन छेडण्यात येईल बाबत सूचित केले होते. साईबाबा मंदिराजवळ दिनांक 23 रोजी सकाळी १० वाजता रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करून आक्रमक पवित्रा घेतला प्रसंगी आंदोलनाला नागरिकांचा मोठा भरभरून प्रतिसाद मिळाला मात्र वेळी व प्रसंगी संबंधित अधिकाऱ्याकडून ठोस आश्वासन मिळाल्या शिवाय माघार न घेण्याचा निर्धार आंदोलकांनी केला होता.

     आंदोलन पुकारले तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आंदोलन स्थळी बोलवण्यात यावे अशी भूमिका घेतली रामप्र चे अधिकारी आंदोलन स्थळी पोहचल्या नंतर उपस्थित पत्रकारांनी  महामार्ग प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांसमोर आक्रमक भूमिका मांडली.व अधिकाऱ्यांकडून तात्काळ काम सुरू करण्यात आले.यावेळी पत्रकारांच्या या सामाजिक आंदोलनाला नागरिकांकडून मोठा व्यापक पाठिंबा मिळाला. यावेळी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, कोठारी शास्त्री भक्ती किशोर दासजी, आ.शिरीष चौधरी ,शिवसेना (ठाकरे गट) प्रहार जनशक्ती पार्टी,वंचित बहुजन आघाडी, भाजपा कार्यकर्ते ,सामाजिक संस्था संघटना यांचे कडून या रस्ता दुरुस्तीच्या आंदोलन ला पाठिंबा देण्यात आला. तर सावदा शहरातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी आजी-माजी लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक तरुणांकडूनही आंदोलनाला मोठा पाठिंबा होता.तात्काळ अधिकारी यांनी  जे सी पी मशीन द्वारे रस्ता दुरुस्तीला प्रारंभ करून मुरूम टाकून दुरुस्त करीत आहे मात्र आंदोलक यांना असे तकलादू  दुरुस्तीचे काम नको असून या ठिकाणी "काँक्रीटकरण "काम करून मिळावे ही रास्त मागणी आहे.

   यावेळी ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष शामकांत, पाटील,प्रवीण पाटील,कमलाकर पाटील,पंकज पाटील, लाला कोष्टी राजेंद्र भारंबे,रविंद्र हीवरकर ,राजेंद्र चौधरी,साजिद शेख, आत्माराम तायडे,जितेंद्र कुलकर्णी ,राजू दिपके ,प्रदीप कुलकर्णी ,राज चौधरी ,योगेश सैतवाल, राजेश पाटील,मिलींद कोरे ,दिलीप चांदेलकर व परिसरातील विविध वृत्तपत्राचे पत्रकार प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. महसूल विभागाकडून नायब तहसीलदार संजय तायडे ,मंडळ अधिकारी प्रवीण वानखेडे,तलाठी रमजान तडवी हे आंदोलन स्थळी उपस्थित होते.

  आंदोलना स्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, उपनिरीक्षक शांताराम पाटील, गुप्तवार्ता विभाग देवेंद्र पाटील, यशवंत टहाकळे यांच्यासह पोलीस कर्मचारी गृह रक्षक दल यांनी चोख बंदोबस्त ठेवला


   सावदा विश्राम गृहात २५ रोजी बैठक..!

आंदोलनादरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यावतीने बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्ग दुरुस्ती संदर्भात उपविभागीय अधिकारी कैलास कडलक,  स्थानिक पत्रकार ,प्रतिष्ठित नागरिक व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांची संयुक्त बैठक दिनांक २५ रोजी सावदा येथे विश्रामगृहावर आयोजित केली जाणार असल्याची माहिती रावेरचे नायब तहसीलदार संजय तायडे यांनी दिली.दिलेल्या वेळेत संबंधित अधिकारी उपस्थित न झाल्यास आंदोलन तीव्र स्वरूपात झेडले जाईल असे जनार्दन जी महाराजांनी सुचित केले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.