Header Ads

Header ADS

27 वा विश्व अध्यात्मिक संमेलनाचा समारोप



27 वा विश्व अध्यात्मिक संमेलनाचा समारोप

नवी दिल्ली- सावन कृपाल रुहानी मिशनचे प्रमुख संत राजिंदर सिंह जी महाराजांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सत्ताविसाव्या विश्वअध्यात्मिक संमेलना चा समारोप 20 सप्टेंबर 2023 रोजी संत दर्शन सिंह जी धाम, बुराडी येथे संपन्न झाला. या भव्य आयोजना प्रसंगी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या लोकांना संबोधित करताना संत राजिंदर सिंह जी महाराजांनी म्हटले की प्रेम, शांति आणि ध्यानाभ्यास आपणांस एकमेकांशी मानव एकतेच्या रूपात जोडतात.


संत राजिंदर सिंह जी महाराजांनी पुढे म्हटले की,  विश्व अध्यात्मिक संमेलन अध्यात्मिकता आणि ध्यानाभ्यासाचे संमेलन आहे, जे प्रत्येक धर्माच्या महान संतांच्या शिकवणुकीवर आधारित आहे. ज्यांनी अध्यात्मिक रुपात परमात्म्याचा अनुभव केला, परमात्मा एक आहे आणि आपणा सर्वांच्या अंतरी ते निवास करतात. भले आपण सर्वांनी त्यांना वेगवेगळी नावे दिली आहेत आणि जरी आपले बाह्य रितीरिवाज सुद्धा भिन्न असले तरी, आपणा सर्वांचे ध्येय एकच आहे ते म्हणजे स्वतःला आत्मिक रुपात जाणणे आणि पिता परमेश्वराला आपल्या अंतरी अनुभवणे.


संयोगाने या संमेलना दरम्यान 20 सप्टेंबरला संत राजिंदर सिंह जी  महाराजांचा जन्मदिवस असतो. ज्यास संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय ध्यानअभ्यास दिवसाच्या रूपात सुद्धा साजरा करतात. विश्वविख्यात अध्यात्मिक गुरु संत राजिंदर सिंह जी महाराजांनी म्हटले की, ध्यानाभ्यास आणि अध्यात्मिकता प्रत्येक धर्माचा आधार आहे.  जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय ध्यानाभ्यास दिवस साजरा करतो तेव्हा या प्रसंगी आपणांस हे समजले पाहिजे की, ध्यानाभ्यास पिता परमेश्वराला प्राप्त करण्याची कुंजी आहे. जेव्हा आपण ध्यानाभ्यास  करतो तेव्हा आपण बाह्य शांति आणि अंधकारा पासून दूर होतो.


आपण जागृत जीवन, प्रकाश आणि चैतन्याच्या दिशेने विकसित झाले पाहिजे. जेव्हा आपण आपल्या अंतरी परमात्म्याच्या प्रेम आणि ज्योतीशी जोडले जातो तेव्हा, शाश्वत शांति आणि आनंद प्राप्त करतो. पिता परमेश्वर इच्छितात की, आपण त्यांना जाणावे, ओळखावे आणि आपल्या अंतरी अनुभवावे. या व्यतिरिक्त आपल्या जीवनाच्या मुख्य उद्देशा प्रति पावलं उचलण्याकरिता नियमित ध्यानाभ्यास करावा. कार्यक्रमाच्या प्रारंभी  पुजनिय माता रीटा जी यांनी गुरुवाणीतील गुरुर्जन देव जी महाराज यांची वाणी, 'ठाकूर तुम्ही शरणाई आया'(हे सद्गुरु, मी तुम्हाला शरण आलो आहे केले. अन्य धार्मिक आणि अध्यात्मिक नेत्यांनी सुद्धा उपस्थित मंचावर अध्यात्म आणि मानव एकते विषयी आपले विचार सादर केले. महामंडलेश्वर डॉक्टर स्वामी प्रेमानंद जी महाराजांनी ध्यानाभ्यासाच्या परिवर्तनकारी शक्ति विषयी सांगितले. तेव्हा महामंडलेश्वर स्वामी देवेंद्रानंद गिरीजी महाराजांनी संत राजिंदर सिंह जी  महाराजांना 'अध्यात्मिकतेचा कोहिनूर' म्हणून संबोधले. या प्रसंगी डॉक्टर स्वामी प्रेमानंद जी महाराजांनी म्हटले की, शांति केवळ ध्यानाभ्यासानेच प्राप्त केली जाऊ शकते. आपण  सर्व अध्यात्माचे जिज्ञासू आहोत म्हणून आपणांस अध्यात्मिक  रूपाने विकसित झाले पाहिजे.  संत राजिंदर सिंह  जी  महाराजांसारखे संत अशी दिव्यशक्ती आहेत जे आपले प्रेम आणि शिकवणुकींद्वारा लाखो आत्म्यांना शुद्ध करतात. संमेलनाला संबोधित करताना महामंडलेश्वर स्वामी देवेंद्रानंद गिरीजी महाराजांनी संत राजिंदर  सिंह जी महाराज एक वैज्ञानिक आहेत, ज्यांनी समयाच्या दिशेला बदलले आहे.  त्यांचे जीवन आणि शिकवणुकी प्रभु प्रेमाचा सुगंध आहेत जे दूर दूर पर्यंत पसरले आहे. ते अध्यात्मिकतेचा कोहिनूर आहेत.

 संमेलनामध्ये आपले विचार प्रकट करताना श्री श्री भगवान आचार्य यांनी एका खऱ्या अध्यात्मिक गुरूंना शोधण्याच्या आवश्यकतेवर भर देताना म्हटले की, एक खरे सद्गुरू आपणांस अंधकारातून  प्रकाशाकडे घेऊन जातात.

   आपणास अध्यात्म आणि जीवनाच्या मुख्य उद्देशास प्राप्त करण्याकरिता ध्यानाभ्यास करण्याची आवश्यकता आहे. त्यांनी म्हटले एक पूर्ण गुरु दयाळू असतात जे आपणांस ईश्वरा प्रति जाण्याचा मार्ग दाखवितात. पूज्य श्री विवेक मुनी जी महाराजांनी संमेलनात संबोधित करताना म्हटले की प्रेम, एकता आणि मानवता यांच्या सामायिक मंचाने अनेक लोकांना ईश्वराकडे पुन्हा जाण्याचा मार्गशोधण्यासाठी मदत केली आहे. त्यांनी म्हटले की आपणांस जीवनात खऱ्या अर्थाने चांगले बनण्याकरता इथे दिल्या जाणाऱ्या शिकवणुकींना आपल्या जीवनात धारण केले पाहिजे. संमेलनात यहुदी धर्माचे रब्बी इजेकील इजाक मालेकर यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हटले की, आपण सर्व ईश्वराचे रूप आणि गुणांसारखे बनलेले आहोत म्हणून अध्यात्मिकतेच्या मार्गावर चालताना आपणांस जीवनात नैतिक गुणांना धारण केले पाहिजे. विदेशी प्रतिनिधींमध्ये कोलंबियाहून आलेले लुईस इन फ्रेंड आणि जर्मनी हून एन्ट्रीयस माको विस्की यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हटले की, निष्काम सेवा आणि संतांची दया व कृपेने आपणांस जीवनातील खरा उद्देश प्राप्त करण्यास मदत मिळते. अंती सर्व अध्यात्मिक प्रमुखांनी एकत्रित येऊन अशा आश्वासनासहित संमेलनाचे घोषणापत्र स्वीकारले की, सर्वात प्रथम आपण संतांच्या शिकवणुकीला आणि ज्ञानाला आपल्या अंतरी धारण केले पाहिजे, दुसरे असे की आपले जीवन परिवर्तित करण्याकरिता ध्यानाभ्यासाच्या शक्तीला ओळखावे, तिसरे नियमित ध्यानाभ्यासाला वेळ देऊन आंतरराष्ट्रीय ध्यानाभ्यास दिवस वास्तविक रूपात साजरा करूया आणि चौथे समस्त मानवते करिता आपल्या अंतःकरणात प्रेम, शांति आणि सद्भावना वृद्धिंगत करूया.

   आठवडाभर चालणाऱ्या संमेलना दरम्यान सावन कृपाल  मिशन ने 13 सप्टेंबर रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिर आणि मोतीबिंदू ऑपरेशन शिबिराचे आयोजन केले. या व्यतिरिक्त 17 सप्टेंबर ला रक्तदान शिबिराचे आयोजन केले ज्यामध्ये 206 बंधू-भगिनींनी स्वेच्छेने रक्तदान केले आणि 20 सप्टेंबर रोजी गरजू बंधू-भगिनींना वस्त्र वितरणाचे आयोजन केले गेले. याप्रसंगी सावन कृपाल  रुहानी  मिशन ने नवी दिल्लीमध्ये राज नगर स्थित शांति आवेदना सदन, सफदरगंज हॉस्पिटलच्या पुनर्वसन विभाग, सेव दी चाइल्ड फाउंडेशन, श्री निवास संस्कृती पीठ बुराडी, आणि स्वयंसेवी संस्थानात आणि हॉस्पिटलमध्ये औषधे,भाज्या, फळं व अन्य उपयोगी उपकरणा व्यतिरिक्त स्टेशनरीचे मोफत वितरण केले गेले.

  27व्या विश्वाध्यात्मिक संमेलनाच्या समारोप सोहळ्यामध्ये भारतातील सर्व राज्यातून आणि जगभरातील विभिन्न देशातील हजारो लोकांनी सहभाग घेतला.सावन कृपाल रुहानी मिशन मीडिया प्रभारी 

सौरभ नरुला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.