महालक्ष्मी पतसंस्थेच्या अवसायकास पाच लाखांची लाच घेतांना रंगेहात पकडले
यावल शहरातील महालक्ष्मी पतसंस्थेच्या अवसायकास पाच लाखांची लाच घेतांना रंगेहात पकडले
लेवाजगत न्यूज यावल : नगर परिषद सावदा जि. जळगाव येथील व्यापारी संकुलातील श्री महालक्ष्मी पतसंस्थेच्या कब्जात असलेला व्यापारी गाळा व गाळ्याची संबंधित अनामत रक्कम तक्रारदार यांचे नावे वर्ग करून देण्यासाठी यावल येथील महालक्ष्मी पतसंस्थेचे अवसायि यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष ५,००,०००/- (पाच लाख) रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम ५,००,०००/- रुपये पंचांसमक्ष स्वीकारल्याने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे विरुद्ध धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सखाराम कडू ठाकरे वय- ५६ हे विशेष लेखा परीक्षक, सहकारी संस्था, (प्रक्रिया) धुळे अति. कार्यभार विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था (भूविकास बँक) जळगाव संस्था, जळगाव तथा अवसायक,महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड यावल जि. जळगाव येथे कार्यरत आहे. सध्या ते ११ राधेय को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी पाचोरा जिल्हा जळगाव येथे निवासाला आहेत. त्यांना सावदा येथे रंगेहात पाच लाखांची लाच स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोनि हेमंत बेंडाळे, पोनि रूपाली खांडवी, पो. हवा. राजन कदम, शरद काटके, पो. शि. संतोष पावरा, रामदास बारेला, गायत्री पाटील, प्रशांत बागुल, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, चालक पोहवा सुधीर मोरे या पथकाने पकडले आले आहे व त्याच्या विरूध्द धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत