Header Ads

Header ADS

विवाहितेवर अनेकदा बलात्कार करून VIDEO केले व्हायरल, पालघरमधील धक्कादायक घटना

 

VIDEO-made-viral by-married-rape-multiple-times,-shocking-incident-in-Palghar

विवाहितेवर अनेकदा बलात्कार करून VIDEO केले व्हायरल, पालघरमधील धक्कादायक घटना

वृत्तसंस्था मुंबई-महाराष्ट्रातील पालघर येथे एका विवाहित महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं पीडित महिलेवर बलात्कार करून तिचे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडितेनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.

      आरोपी हा विवाहित असून त्याने पालघर येथील एका विवाहित महिलेबरोबर मैत्री केली होती. यानंतर आरोपीनं वारंवार विवाहितेवर बलात्कार केला. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्यांनी शरीरसंबंध ठेवतानाचे व्हिडीओही शूट केले. तसेच संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.

    ‘फ्री प्रेस जर्नल’ने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी मुख्य आरोपीसह अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६(२)(एन) (एकाच महिलेवर वारंवार बलात्कार) आणि माहिती व तंत्रज्ञान (आयटी) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीनं पीडित विवाहितेवर वारंवार बलात्कार करून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.