Header Ads

Header ADS

सावदा येथे तलाठी नसल्याने विद्यार्थी व शेतकरी यांचे रडखडली कामे

 

सावदा येथे तलाठी नसल्याने विद्यार्थी व शेतकरी यांचे रडखडली कामे

सावदा येथे तलाठी नसल्याने विद्यार्थी व शेतकरी यांचे रडखडली कामे

प्रतिनिधी सावदा -येथील तलाठी कार्यालयात गेल्या दहा दिवसापासून येथील कार्यरत तलाठी शरद पाटील यांची बढती वर बदली झाल्याने ते चाळीसगाव येथील पाटण येथे रुजू झालेआहे.

  त्यांच्या रिक्त जागेवर अजून पर्यंत कोणाचीच नेमणूक न झाल्याने नागरिकांची कामे रडखडली आहे.सावदा हे शहर पंचवीस हजार  लोकसंख्या  असून येथे दररोज तलाठी कार्यालयात शेतकरी वर्ग व विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागणारे दाखले व शेतकऱ्यांना लागणारे विविध नोंदी यांचे काम असते .परंतु येथे दहा दिवसापासून कोणीही तलाठी नसल्याने नागरिक व विद्यार्थ्यांचे कागदपत्रांसाठी भटकंती करावी लागत आहे.विनाकारण त्रास  सहन करावे लागतात आहे व तलाठी नसल्याने ते आपल्या शेतकरी अनुदानापासून व विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांची ओरड वाढत असून या ठिकाणी लवकरात लवकर कायमस्वरूपी तलाठी नेमण्यात यावा अशी मागणी शहरातील विद्यार्थ्यांसह पालक वर्ग व शेतकरी वर्ग करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.