मास वाहून नेणारा ट्रक पाळधीत पेटवला,दगडफेकीत पोलीस कर्मचारी जखमी
मास वाहून नेणारा ट्रक पाळधीत पेटवला,दगडफेकीत पोलीस कर्मचारी जखमी
वृत्तसंस्था जळगाव -मांस वाहून नेणारा ट्रक पकडून दिल्यानंतर देखील पोलिस कर्मचाऱ्याने तो जप्त करुन न घेता महामार्गाच्या दिशेने सोडल्याचा समज झाल्याने काही तरुणांनी हा ट्रक पेटवून दिला. पोलिस संतप्त तरुणांवर लाठीहल्ला करीत असताना ही घटना घडली. गुरुवारी रात्री ९.३० वाजता पाळधी बायपास रोडवर ही घटना घडली. या घटनेने पाळधी गावासह परिसरात रात्री १२.३० वाजेपर्यंत तणावाचे वातावरण होते.
बांभोरी एसएसबीटी कॉलेजजवळ पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी गुरुवारी रात्री ९ वाजता एक ट्रक थांबला होता. त्यातून दुर्गंधी येत असल्याने तरुणांना संशय आला. त्यांनी ट्रकचालकाची विचारपूस सुरू केली. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर या तरुणांसह पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी वाद नको म्हणून पाळधी दूरक्षेत्रला फोन करुन माहिती दिली. काही वेळातच एक पोलिस कर्मचारी पंपावर दाखल झाला. या कर्मचाऱ्याने ट्रकचा ताबा घेऊन चालकास गाडी पुढे नेण्यास सांगितले. हा ट्रक पाळधी दूरक्षेत्राला जमा न करता बायपासच्या दिशेने पुढे जात असल्याने पोलिस कर्मचारी ट्रक सोडून देत असल्याचा संशय पाठीमागून येणाऱ्या तरुणांना झाला. परिणामी त्यांनी ट्रक अडवला. काही समजण्याच्या आतच या तरुणांनी ट्रकचालकास मारहाण करीत ट्रक पेटवून दिला.
घटना हाताबाहेर गेल्यानंतर पोलिसांचा ताफा दाखल झाला. पोलिसांनी तरुणांची गर्दी पांगवण्यासाठी लाठीहल्ला केला. तरी देखील तरुणांनी घटनास्थळ न सोडता ट्रक पेटवून दिला. या प्रकारामुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी तसेच तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती पाळधी गावात पोहोचताच अनेक तरुण गटाने घटनास्थळाकडे निघाले होते.
रात्री उशिरापर्यंत हा गोंधळ सुरू असल्याने पोलिस अधीक्षक एम. राजकुमार घटनास्थळी पोहोचले होते. तसेच परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दंगा नियंत्रण पथकाच्या दोन तुकड्या पाळधीत दाखल झाल्या. पोलिसांनी संबंधित ट्रकचालकासह एकाला चौकशीसाठी रात्री उशिरापर्यंत ताब्यात घेतले होते.
ट्रक पेटवताना पोलिस व संतप्त तरुणांतप्रचंड तणाव निर्माण झाला. एकीकडेपोलिस लाठीहल्ला करीत असतानातरुणांनी देखील त्यांच्यावर दगडफेककेली. यात काही पोलिस कर्मचारी जखमीझाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीआहे. जखमी पोलिसांना सिव्हिलहॉस्पिटल येथे उपचारासाठी पाठवले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत