Header Ads

Header ADS

मदरशात तिरंग्यावर दिला गेला नाश्ता, फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई

 

Madaraśāta-tiraṅgyāvara-dilā-gēlā- nāśtā,-phōṭō-vhāyarala-jhālyānantara-pōlisān̄cī-kāravā'ī

मदरशात तिरंग्यावर दिला गेला नाश्ता, फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई

वृत्तसंस्था UP-भारताचा स्वातंत्र्य दिन नुकताच साजरा झाला. आपला तिरंगा ध्वज हा आपल्या देशाचा आणि प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे. मात्र याच तिरंग्याचा अपमान केल्याची घटना उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमध्ये घडली. एकीकडे स्वातंत्र्य दिवस साजरा होत होता आणि प्रयागराजमधल्या एका मदरशात तिरंग्यावर नाश्ता ठेवण्यात आला. या संदर्भातला फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.

    फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई

    पोलिसांनी व्हायरल फोटोच्या आधारे मदरसा प्रमुखासह चार जणांच्या विरोधात राष्ट्रध्वजाच्या अपमानाचा गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रीय ध्वज अपमान प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांन्वये प्राथमिक तपास सुरु करण्यात आला आहे. ही घटना गौसिया इस्लामिया जिंतुल उलूम या मदराशात घडली आहे असं सांगितलं जातं आहे. होलागढ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हा भाग येतो. या घटनेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली.


स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तिरंगा अंथरुन त्यावरच नाश्ता दिला गेल्याचा हा फोटो आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर स्थानिक लोकांनी आंदोलन केलं. हा हंगामा इतका वाढला की पोलिसांना पाचारण करावं लागलं. या ठिकाणी पोलीस आल्यानंतर त्यांनी आंदोलन करणाऱ्यांना कारवाईचं आश्वासन दिलं आणि मदरसा प्रमुखासह चार जणांवर गुन्हा दाखल केला. नवभारत टाइम्सने या विषयीचं वृत्त दिलं आहे. 

   मदरशात स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तिरंग्यावर नाश्ता दिला गेल्याचा हा फोटो ट्विटरवर व्हायरल झाला. एका नेटकऱ्याने हा फोटो मुख्यमंत्री उत्तर प्रदेश, डीजीपी, यांच्यासह अनेकांना टॅग केला. तसंच कारवाईची मागणी केली. हा फोटो समोर आल्याने गदारोळ झाला होता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.