Header Ads

Header ADS

"जिद्द " सामाजिक संस्था केगांव उरण तर्फे वृक्षारोपण संपन्न

"Jidd"-social-institution- Kegaon-Uran-by-tree-plantation-completed


 "जिद्द " सामाजिक संस्था केगांव उरण तर्फे वृक्षारोपण संपन्न  

उरण (सुनिल ठाकूर )भारताचा स्वातंत्र दिवसाचे औचित्यसाधून “जिद्द सामाजिक संस्था केगांव उरण” यांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण सोहळा श्री. माणकेश्वर मंदीर,आदर्श विद्या मंदिर केगांव शाळे जवळ तसेच केगांव आवेडा-दांडा स्मशान भूमी येथे उत्साहात पार पडला.

सदर प्रसंगी मोरा  सागरी पोलीस ठाण्याचे उप निरीक्षक मा. श्री.धुमाळ साहेब ,श्री घाडगे साहेब, श्री कुठार साहेब,  श्री जाधव साहेब, श्री पाटील साहेब  तसेच रोटरी शाळेचे अध्यक्ष श्री.विकास महाजन व सचिव श्री.यतीन म्हात्रे, केगाव गावाचे सन्माननीय ग्रामस्थ यांची प्रमुख उपस्थिती या उपक्रमाला लाभली. सगळ्या प्रमुख पाहुण्यांनी वृक्षारोपण करून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शना वेळी जिद्द सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री.अतिश के. हुजरे यांनी प्रमुख पाहुण्यांचे तसेच माणकेश्वर मंदिर परिसरात कार्यक्रमाला जागा उपलब्ध करून दिली. त्यासाठी माणकेश्वर ट्रस्ट चे अध्यक्ष श्री.शैलेश श. म्हात्रे यांचेही आभार मानण्यात आले.

       या कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थित रित्या पार पडल्याबद्दल संस्थेचे पदाधीकारी उपाध्यक्षा सौ.नूतन ज. पाटील, सचिव सौ.तृप्ती ज. पाटील, खजिनदार श्री.भूपेंद्र का. म्हात्रे आणि सदस्य सौ. जयश्री र. पाटील,सौ.सुवर्णा नि. ठाकूर, सौ.पूर्णिमा अ. हुजरे,सौ. प्रेरणा प्र. पाटील, सौ.मनीषा प. पाटील,श्री. श्रीकृष्ण दा. पाटील,श्री. निलेश अ. ठाकूर,श्री. प्रवीण ज. पाटील,श्री.सत्येन्द्र हि. ठाकूर,श्री.रमाकांत ना. पाटील, श्री.पद्मसेन दा.पाटील,श्री.जयहिंद ग. पाटील,श्री.सोहिल मं. राणे, श्री.जयहिंद शं. पाटील,श्री.भूपेश नं. ठाकूर ह्या सगळ्यांचे   आभार मानून  या कार्यक्रमाची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.