जळगाव जिल्ह्यातील रामेश्वर त्रिसंगमावर गेलेल्या तिघांवर काळाने घात केला
जळगाव जिल्ह्यातील रामेश्वर त्रिसंगमावर गेलेल्या तिघांवर काळाने घात केला
लेवाजगत न्यूज जळगाव- जिल्ह्यातील रामेश्वर त्रिसंगमावर कावड यात्रेच्या सोबत गेलेल्या तिघांवर काळाने घात केला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथिल तिघे युवक नदीपात्रात पोहण्यासाठी गेल्याने तिघे जण बुडाल्याची घटना घडली तापी नदी पात्रात बुडालेल्या तिघांचा शोध घेण्याचे काम शिघ्रगतीने सुरू असून त्या तिघांचा शोध घेत असतांना दोन तरुणांचा मृतदेह आढळला असून एक जणाला शोधण्याचे कार्य सुरु आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत तिसऱ्या तरुणाला शोधण्याचे काम सुरु आहे. तिन्ही तरुण एकाच परिवारातील असल्याची माहिती मिळाली आहे या घटनेने एरंडोल तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. एरंडोल येथिल तरुण कावड यात्रा घेऊन दर्शनासाठी आज दिनांक २१ सोमवार रोजी पहाटेच्या चार वाजेच्या सुमारास वाहनाने जळगाव जिल्ह्यातील तापी - गिरणा या त्रिवेणी संगमावर असलेल्या रामेश्वर महादेव मंदिरावर दर्शन घेण्यासाठी गेले होते. देवदर्शन घेतल्यावर काही तरुण तापी पात्रात स्नानासाठी उतरल्यानंतर पियूष रविंद्र शिंपी वय २३ वर्षे, सागर अनिल शिंपी वय २४वर्षे, अक्षय प्रविण शिंपी वय २२ वर्षे हे तिघही तरुण चुलत भाऊ पाण्यात उतरले परंतु त्या तिघांना पाण्याचा अंदा न आल्याने तिघे तरुण तापीच्या नदीपात्रात बुडाले. सोबत असलेल्या तरुणांनी या घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांना व प्रशासनाला दिल्यावर घडलेल्या घटनेची चर्चा सुरू झाली. तीन तरुण तापी नदी पात्रात बुडाल्याची माहिती मिळताच पोलीस प्रशासन व आपत्ती व्यवस्थापनाचे पथक घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. काही पट्टीच्या पोहणाऱ्या लोकांनी बुडालेल्या तरुणांचा शोध घेतला असता दोन तरुणांचे मृतदेह मिळून आले तर एका तरुणाचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी पवार यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. या दुर्दैवी घटनेमुळे एरंडोल तालुक्यासह जळगाव जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
लेवाजगत न्यूज आवडत असल्यास बातमी शेअर करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत