गावात झळकेल तलाठ्याचे वेळापत्रक मोबाईल नंबरही
गावात झळकेल तलाठ्याचे वेळापत्रक मोबाईल नंबरही
प्रतिनिधी सोलापूर- आज तलाठी कोठे आहेत गावात कधी येणार हे शोधत बसण्याची आता गरज नाही. गावातील दर्शनी भागात ठळक अक्षरात वेळापत्रक लावणे आता तलाठ्यांसाठी बंधनकारक झाले आहे. इतकेच नाही तर दूरध्वनी किंवा मोबाईल नंबर ही सार्वजनिक करावा लागणार आहे. राज्य सरकारने गावकऱ्यांना दिलासा देणारा राज्य शासनाने १८ ऑगस्ट रोजी आदेश काढला.
गावात तलाठी यांना भाऊसाहेब म्हणतात अनेक ठिकाणी एका तलाठयाकडे दोन किंवा तीन गावांचा पदभार असतो. एका गावातून फोन केला की आज दुसऱ्या गावात आहे, दुसऱ्या गावातून फोन केला तर तिसऱ्या गावात आहे, असे उत्तर ऐकण्याचा अनुभव अपवादात्मक राहिलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तलाठी शोधण्यासाठी मोठाच आटापिटा करावा लागतो. असे कधी कधी तहसील कार्यालयात जाऊन शोध घ्यावा लागत असे. यापुढे तलाठयाचा शोध घ्यावा लागणार नाही. आज तलाठी कुठे आहे हे गावातच कळणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत