महिला पोलिसांची गळफास घेऊन प्लॅट मध्ये आत्महत्या
महिला पोलिसांची गळफास घेऊन प्लॅट मध्ये आत्महत्या
वृत्तसंस्था अकोला-मी स्वच्छेने आत्महत्या करीत आहे, कुणालाही जबाबदार धरू नये, माझी लाश नातेवाइकांच्या हवाली करू नये, सरकारी रुग्णालयात ठेवावी’. असे मृत्यूपूर्व चिठ्ठीत लाल पेनाने लिहून महिला पोलिस कर्मचारी वृषाली दादाराव स्वर्गे (वय ३५) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले. त्यांचा मृत्यू दोन दिवसांपूर्वी झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
पोलिस खात्यात असलेल्या पतीच्या अकाली निधनानंतर अनुकंपा तत्वावर वृषाली या पोलिस दलात रुजू झाल्या होत्या. त्या अकोला येथील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात कर्तव्यावर होत्या. त्यांना मूलबाळ नव्हते. त्या गीतानगर येथील घरामध्ये एकट्याच राहत होत्या. बुधवारी सकाळी त्यांच्या वृषाली यांनी सुसाईड नोटमध्ये नातेवाइकांच्या ताब्यात मृतदेह देऊ नये, शासकीय रुग्णालयाला द्यावा, असे जरी लिहले असले तरी आपण त्यांचे भाऊ आणि बहिणींना अंत्यसंस्काराबाबत विचारले. त्यांनी अंत्यसंस्कार आपणच करणार असल्याचे सांगितल्यानंतर त्यांच्या ताब्यात मृतदेह दिला.
रात्री उशिरा मोहता मील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. नितीन लेव्हरकर , ठाणेदार जुने शहर पोलिस ठाणे. फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी अनेकदा दरवाजाही ठोठावला, परंतु आतून कुठल्याही प्रतिसाद येत नव्हता. त्यानंतर जुने शहर पोलिसांना माहिती देण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा उघडला असता आत वृषाली स्वर्गे यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. तसेच पोलिसांना सुसाईड नोटही दिसून आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत